हिसाळे ग्राम पंचायत उप सरपंच पदी सौ.स्वाती विकास पाटील यांची बिनविरोध निवड




शिरपूर तालुक्यातील पुर्व पट्टय़ात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हिसाळे गावातील गुरू गोरक्षनाथ ग्रामविकास पॅनलला बहुमत मिळाल्यानंतर आज दिनांक १०\१\२०२३ रोजी उपसरपंच पदासाठी निवडणूक होती.त्यात माजी पंचायत समिती सभापती श्री.संजय संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री.विकास गुलाबराव पाटील यांनी उभ्या केलेल्या गुरू गोरक्षनाथ ग्रामविकास पॅनलमधून निवडून आलेले लोकनियुक्त सरपंच श्री.उत्तम मला पावरा यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्विकारला व उपसरपंच पदी श्री.विकास गुलाबराव पाटील यांच्या धर्मपत्नी सौ.स्वाती विकास पाटील यांची बिनविरोध निवड झाली व त्यांनीही उपसरपंच पदाचा कार्यभार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षीने स्विकारला.


सदर कार्यक्रमास माजी सरपंच श्री.संतोष नाटू पाटील,माजी पंचायत समिती सभापती श्री.संजय संतोष पाटील, गुरू गोरक्षनाथ ग्रामविकास पॅनलचे सदस्य श्री.भास्कर तान्हू गायकवाड, श्री.राजू जगराम भिल,सौ.स्वाती विकास पाटील,सौ.छायाबाई नरेंद्र पाटील, श्रीमती.भिकूबाई भिवसन कोळी,सौ.प्रमिलाबाई बापू भिल तसेच श्री.गोरख अनाज्या पावरा व श्री.गुलाब फत्तू पावरा हे निवडून आलेले सदस्यही उपस्थित होते.एकूण निवडून आलेल्या ११ सदस्यांपैकी ९ सदस्य व लोकनियुक्त सरपंच कार्यक्रमास उपस्थित होते.तसेच पॅनल प्रमुख व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला नवनिर्वाचित उपसरपंचाचे मा.श्री.आमरिशभाई पटेल(माजीआमदार),श्री.काशिराम पावरा(आमदार शिरपूर) व श्री.तुषारभाऊ रंधे(जि.प.अध्यक्ष) यांनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्यात.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने