भामपुर येथील आर. सी . पटेल माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती " महिला शिक्षण दिन" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.पी .दिक्षित सर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणार्या, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे योगदान, त्यांचे कार्य आणि त्यांनी रुजविलेले शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन विद्यालयात ' निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
निबंध स्पर्धेचा विषय - "स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सावित्रीबाई फुले" आणि बेटी बचाओ बेटी पढाओ हा देण्यात आला होता.
या निबंध स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी एकूण 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
मुख्याध्यापक श्री व्ही .पी .दीक्षित सर यांनी महिला शिक्षण दिन विषयी माहिती दिली.
विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षिका श्री एस बी पाटील मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्य आणि कर्तृत्व विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरुण चौधरी सरांनी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दिनेश ठाकरे सरांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.
