शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांनी शिंदखेडा मतदारसंघातील आमदार माजी मंत्री आ.जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्ताने वनश्री ऑक्सिजन पार्क येथे मार्केट कमिटीचे चेअरमन श्री नरेंद्र सिंह सिसोदिया, आर.सी पटेल शाळेचे मुख्याध्यापक श्री ईश्वर पाटील सर ,प्रीतम गिरासे व अक्षय राजपूत यांच्या हस्ते रोप लावून जयकुमार भाऊंच्या वाढदिवस साजरा केला.
भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व्हावे म्हणून आर.सी. पटेल प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना १०० रोपांचे वाटप केले सदर विद्यार्थी जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्ताने या रोपांचे वृक्षारोपण करणार आहेत.
शिरपूर तालुक्यातील वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांनी आतापर्यंत ७०० लोकांचे वाढदिवस वृक्ष लागवड करून साजरी केले आहेत .त्यात जवळपास ०३ हजार रोपांचे वाटप केले आहे. हे काम ०७ महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. वाढदिवसा निमित्ताने लावलेले सर्व झाडे जिवंत असून भोरखेडा येथील वनश्री ऑक्सिजन पार्कच्या परिसरात 50 एकरावर 32 हजार बांबूंच्या झाडांनी बहर घेतला आहे. वृक्ष लागवडीने पर्यावरण जलसंधारण मृदसंधारण सेंद्रिय खत जैविक विविधता याचे चांगले काम होत आहे हे पाहण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल देखील या ठिकाणी येत असते जेणेकरून विद्यार्थी वृक्ष संवर्धन व पर्यावरणाची प्रेरणा घेतील. या तालुक्यामध्ये पर्यावरण संदर्भात व वृक्ष लागवडी संदर्भात शिवाजी राजपूत यांचे काम वाखाणण्याजोगे असून एक सच्चा पर्यावरण दूत म्हणून त्या तालुक्यात अविरत कार्यरत आहेत.
