नाशिक=छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट, पूणे या संस्थेच्या वतिने यंदाचा छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक सोहळा नाशिक येथे किल्ले रामसेजवर साजरा करण्यात येणार आहे. शिवशंभू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेअसे आव्हान करण्यात आले आहे
सकाळी ९-०० वाजता गडपूजन, पालखी सोहळा व शंभूराजांच्या प्रतिमेचे पुजन असा छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
११-३० वाजेपासून आशेवाडी येथे दुगसंवर्धन करणार्या विविध संस्थांचा छोटेखानी सत्कार सभारंभ होणार आहे. त्यानंतर इतिहासाचे अभ्यासक गिरिश टकले यांचे, छत्रपती संभाजी महाराज व रामसेजचे युद्ध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. वैनतेय गिर्यारोहण संस्था, गडवाट परिवार, मराठी मुलूख अशा संस्थांचे या आयोजनात सहकार्य लाभले आहे.
नाशिककरांच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आहे की, छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक सोहळा प्रथमच नासिक येथे आयोजित करण्यात आला आहे. मागिल वेळेस गोवा येथे फोंडा ह्या किल्ल्यावर हा कार्यक्रम घेण्यात आला होता. पुढ जाऊन गोवा सरकारने हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम म्हणून घोषित केले. नासिकमध्ये शंभूराजांच्या पराक्रमाची पदचिन्ह रामसेजच्या रूपाने उमटलेली आहेत. मोगलांच्या विशाल सेनेला मराठ्यांनी अतिशय कमी संख्याबळ असताना केलेला प्रतिकार इतिहासात स्वर्णाक्षरांनी नोंदवावा असा आहे.
गड स्वच्छता व संवर्धन करणार्या या संस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे.
१. टीम देहेरगड, नासिक
२. वृक्षवल्ली फाऊन्डेशन, चामरलेणी
३. स्वराज्य संवर्धन बहुद्देशीय संस्था
४. दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान
५. शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था
६. संस्कृती बहुउद्देशीय गडदुर्ग संवर्धन संस्था विल्होळी नाशिक
७. शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था
