15 लाख 72 हजार रुपये किमतीचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची मध्य प्रदेश राज्यात धडक कारवाई...!!! नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




नंदुरबार - दिनांक 05/12/2022 रोजी रात्रौ 01/15 वा सुमारास नवापुर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील MIDC कडे जाणारे रस्त्यावर 1) हैदर उर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण वय- 20 वर्ष रा- कुंजखेडा ता. कन्नड जि- औरंगाबाद 2 ) इरफान इब्राहिम पठाण वय - 353) युसुफ असिफ पठाण वय- 224) गौसखॉ हानिफखॉ पठाण वय 34 क्र. 2 ते 4 रा- ब्राम्हणी गराडा ता कन्नड जि. औरंगाबाद 5) अकिलखॉ ईस्माईलखॉ पठाण वय- 22 रा. कठोरा बाजार ता. भोकरदन जि- जालना हे भागात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असतांना एक महिंद्रा कंपनीची ग्रे रंगाची स्कार्पिओ मोटार गाडी MH 13 N 7626 वाहनासह मिळून आले म्हणुन त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 640/2022 भादंवि क 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सकाळी 06.45 वा. अटक करण्यात आली होती.

परंतु दिनांक 05/12/2022 रोजी 09.05 वा. सुमारास वर नमुद पाचही आरोपीतांनी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून त्याद्वारे पलायन केले होते. म्हणून नवापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 642/2022 भादंवि क 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीसांच्या पथकाने फरार झालेले सर्व पाच आरोपीतांना मध्य प्रदेश व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे..

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी गौसखॉ हानिफखॉ पठाण हा सराईत असल्याने त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सुमारे सप्टेंबर - 2022 मध्ये नवापूर येथे त्याच्या वरील साथीदारांच्या मदतीने चंदनाचे झाड कापून तसेच महाराष्ट्र व इतर राज्यात चंदनाचे झाड कापून ते इतर साथीदारांचे मदतीने अब्दुल रेहमान कादर रा. गवाडी ता.जि. सेंधवा मध्य प्रदेश यांना विक्री केल्याचे सांगितले. नवापूर येथील चंदन चोरीबाबत नवापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 478/ 2022 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात 20,000/- रु. कि. चे एक चंदनाचे हिरवे झाड कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यात रवाना केले. पथकाने मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा गवाडी गावात जावून अब्दुल रेहमान कादर याची माहिती घेतली असता अब्दुल कादर याचे एस. बी. अरोमॅट्रीक्स नावाची फक्टरी असल्याचे समजून आले. पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने अब्दुल रेहमान कादर याच्या मालकीचे एस.बी. अरोमॅट्रीक्स फॅक्टरीमध्ये गेले असता तेथे तीन इसम उपस्थित होते. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता 1) अब्दुल रहेमान अब्दुल कादर वय-58 मुळ राहणार कुन्नीकलम हाऊस, आलंम्मपाडे ता. मुथवडे जि. कासारगड, केरळ ह.मु. एस. बी. अरोमॅक्ट्रीक्स फॅक्टरी, गवाडी ता. निवाणी जि. बडवाणी म.प्र. 2) सौदागर सहदेव कोलते वय-46 3) उमेश विलास सुर्यवंशी वय-40 दोन्ही रा. नारी ता. बारशी जि. सोलापूर असे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेला अब्दुल रहेमान कादर यास गौसखाँ पठाण याची ओळख देवून त्याने दिलेल्या चंदनाच्या झाडाचे लाकुडबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. म्हणून पथकाने संपूर्ण फॅक्टरीची पाहणी केली असता एक टाटा कंपनीच्या YODHA गाडीमध्ये खालच्या बाजूने दोन तीन फुटाचे लांब खाच व त्यामध्ये 5,84,000/- रु. किं.चे 292 किलो चंदनाचे लाकडाचे तुकडे मिळून आले, म्हणून पथकाने फॅक्टरीची बारकाईने पाहणी केली असता तेथे 17,72,000/- रुपये किमतीचे 26.02 किलो ग्रॅम वजनाचे चंदनाचे सुगंधी तेल व चंदनाचे लाकुड वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे 7,00,000/- रु. किं.चे एक टाटा कंपनीचे YODHA वाहन क्रमांक MH-46 BF-0543 असा एकुण 28,56,000/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत करुन तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

ताब्यात घेण्यात आलेला अब्दुल कादर यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यास गौसखाँ पठाण याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून चंदनाचे झाडाचे तुकडे चोरी करुन आणल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील आणखी काही चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेवून त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील चंदन चोरीचे बरेचसे गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, पोलीस उप निरीक्षक श्री. अशोक मोकळ, पोलीस हवालदार दिनेश वसुले, पोलीस नाईक योगेश थोरात, विनोद पराडके, हेमंत सैंदाणे, पोलीस अंमलदार गणेश बच्छे, परमानंद काळे, दिनेश बाविस्कर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव पोलीस अंमलदार अभय राजपुत यांच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने