*नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस*
*महानिरीक्षक* *डॉ.बी.जी.शेखर* *यांची बदली रद्द,*
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांची गेल्या चार दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती, त्याच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र राज्याचे गृह विभागाच्या सहसचिवांनी ही बदली रद्द केली असून सुनील फुलारी यांची आता कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे तर विद्यमान महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर यांची झालेली बदली रद्द करण्यात येऊन त्यांच्याकडे पुन्हा नाशिक परीक्षेत्राची जवाबदारी देण्यात आली आहे.
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी शुक्रवार, १६ रोजी काढले आहेत.
*अमिताभ गुप्ता -* अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा म.रा.
*रंजनकुमार शर्मा-* अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर
*सुनील फुलारी -* विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र
*संजय मोहिते-* पोलिस सहआयुक्त, नवी मुंबई
*सुरेशकुमार मेंगडे -* मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई
*रवींद्र शिसवे -* पोलिस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई मनोज लोहिया- पोलिस सहआयुक्त पिंपरी-चिंचवड
*सुहास वारके -* विशेश पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था पोलिस महासंचालक म.रा.
*संजय दराडे -* अपर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, बृहमुंबई
