शिरपूर येथिल आर सी पटेल आश्रमशाळेत थोर गणिती रामानुजन यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
त्यानिमित्ताने गणिती संकल्पनांवर आधारित रांगोळी स्पर्धा , पथनाटय, पोस्टर स्पर्धा व प्रश्न मंजुषा इ. उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यानी गणिताचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत.
इ. ८ ते १२ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यानी पोस्टर प्रदर्शन व प्रश्नमंजुषा कार्यक्रमात यशस्वी सहभाग नोंदविला. प्रश्नमंजुषा कार्यक्रमात आर्यभट्ट , भास्कराचार्य, श्रीधराचार्य व शकुंतलादेवी या महापुरूषांच्या नावाचे गट तयार करण्यात आलेले होते. सदर प्रश्नमंजुषेत विविध गणिती संकल्पनांवर प्रश्न विचारण्यात आलेत. सदर प्रश्नमंजुषेत शकुंतला गटाने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर उर्वरित तिन्हीं गटांना समान गुण प्राप्त झाल्याने त्यांना द्वितिय क्रमांक मिळाला.
परिक्षक म्हणून श्री आर एन पाटील यांनी काम पाहीले.
प्रारंभी प्राचार्य श्री एच के कोळी व मुख्याध्यापक श्री बी बी सोनवणे यांनी रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
गणित शिक्षक श्री पी डी बच्छाव यांनी रामानुजन यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. रामानुजन यांची गणित विषयातील कामगिरी त्यांनी विविध उदाहरणांसह मांडली. श्री पेंढारकर व श्रीमती हजारे यांनी सूत्रसंचालन केले. श्री लांबर्डे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमांना शाळेचे विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
