उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांचा महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

 

धुळे प्रतिनिधी - धुळे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार यांना महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


संगमनेर येथील जय हिंद लोक चळवळ व निसर्ग मित्र समितीकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी जिल्ह्यात बारव संवर्धनाच्या यशस्वी उपक्रम राबविला, प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनासारखे विधायक निसर्ग उपयोगी पर्यावरण पूरक उपक्रम हाती घेतले. पाणी आडवा पाणी जिरवा ,पशुपक्ष्यांची जोपासना ,प्रदूषण मुक्त दिवाळी इत्यादी अभियान राबवून पर्यावरणाचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा शौचालय चळवळीविषयी लोकांमध्ये जनजागृती साठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भूषण जीवनगौरव सारखा पुरस्कार देण्यात आला आहे.


धुळे जिल्हा परिषदेमध्ये देखील त्यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे स्वच्छता व पर्यावरण विषयी दूरदृष्टी व एक विशिष्ट ध्येय ठेवून सरकारी योजना पारदर्शीपणे राबविण्यात व त्यास लोकसहभागाची जोड देऊन कार्य करणारे कर्तव्यदक्ष असे अधिकारी धुळे जिल्ह्याला लाभल्याने जिल्ह्याच्या विकासात देखील भर पडणार असून अशा कृतिशील अधिकाऱ्यांची जिल्हाभरातून स्वागत होत आहे.


त्यांच्या या कार्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी पवार, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वर एस,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांचे देखील सहकार्य लाभले आहे.


शिर्डी येथे साई पालखी निवारा या ठिकाणी दिनांक १० रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत श्री पवार यांना हा मानाचा पुरस्कार आ. सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याबद्दल श्री पवार यांचे सुभान पिंजारी ,जितेंद्र राठोड, डॉक्टर प्रवीण गिरासे ,वाल्मीक सोनवणे ,राजेंद्र माळी, सर्जेराव भामरे, प्रशांत वर्मा ,सुरेश सूर्यवंशी, माधव सिंग राऊत आदींनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने