मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा नविन प्रवाशी रेल्वे धावणार आ.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नांना यश

 

दोंडाईचा ( दि.२१/१२/२२) भुसावळ बांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेसच्या प्रचंड प्रतिसादामुळे तमाम खान्देशातील प्रवाशांची खान्देश एक्स्प्रेस दररोज करण्याची मागणी आ.जयकुमार रावल यांच्याकडे होती परंतु मध्य रेल्वेच्या जळगाव भुसावळ स्थानकांवर तांत्रिक अडचणींमुळे शक्य होत नव्हते यावर पश्चिम रेल्वे ने पर्याय काढत दोंडाईचा स्थांनकापावेतो नविन मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा ०९०५१ व दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल ०९०५२ हि गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.

पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.२३ डिसेंबर पासुन ३१ मार्च पावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असुन सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान दादर बोरीवली वापी बलसाड नवसारी चलथान बेस्तान बारडोली व्यारा नवापुर नंदुरबार इ ठिकाणी थांबुन सकाळी ८.०५ मिनीटांनी दोंडाईचा येथे पोहोचेल.दोडांईचाहुन सोमवार बुधवार व शनीवारी रात्री १०.१५ मिंनीटांनी सुटेल तर मुंबई सेंट्रल येथे सकाळी ६ वा.पोहचेल.

सदर गाडी दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर दिवसभरात एक फेरी उधनासाठी धावणार असुन सकाळी ११.३० वा.दोडांईचाहुन उधनासाठी सुटेल व उधना येथे दुपारी २.३०वा.पोहचेल उधना येथुन ४.३० वा दोंडाईचासाठी निघेल व दोंडाईचा येथे सायंकाळी ७.३० वा.पोहचेल तरी सदर गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन दोंडाईचा प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष खुर्शिद कादीयानी यांनी केले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने