शिरपूर प्रतिनिधी - शहरातील खालचे गाव बौद्धवाड्यात समाज भवन जवळ मागील भांडणाची कुरापत काढून चाकूने वार करून दोघांना जखमी करून घरात घुसून कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात यश उर्फ अजु फुला खैरनार, फुला आनंदा खैरनार, पिंटू आनंदा खैरनार, छोटू आनंदा खैरनार सर्व राहणार बौद्धवाडा शिरपूर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात संदेश प्रकाश थोरात वय 29 रा. खालचे गाव बौद्ध वाडा शिरपूर यांनी तक्रार दाखल केली आहे.
दाखल तक्रारी अनुसार संशयतांनी मागील भांडणाची कुरापत काढून संदेश थोरात यास घरालगत असलेल्या समाज भवन बौद्ध वाडा जवळ बोलावून मागील भांडणाची कुरापत काढून दमदाटी करत यश उर्फ अजु फुला खैरनार यांनी त्याच्या हातातील चाकूने पाठीवर, पोटावर वार केला तर इतरांनी मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या निखिल उर्फ सोनू सोनवणे यावर देखील वार करून जखमी करीत संशय त्यांनी घरात घुसून वस्तूंची तोडफोड केली व मारहाण करून कुटुंबातील इतरांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नंदाळे करीत आहेत.
