सरदार धुळोजीराव मोरे यांना अभिवादन : मोरे घराण्याचा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे : 'मोरे' घराण्याचे पहिले राष्ट्रीय संमेलन हे यशवंतराव मोरे आश्रम शाळा, मोढवे ता बारामती जिल्हा पुणे येथे पार पडले. मोरे घराण्याचा अपरिचित इतिहास सर्वांना कळावा तसेच देशातील समस्त मोरे कुटुंबीय एकत्र यावे म्हणून या स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून सरंजामी मरहट्टे या संदर्भग्रंथांचे लेखक संतोष ग. पिंगळे उपस्थित होते, त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक माहितीनुसार, "हिंदवी स्वराज्यात मोरे घराण्याचे योगदान आहे. मराठेशाहीच्या कालखंडातील एका ऐतिहासिक पत्रात सासवड कर्यातीतील मौजे मोढवे गावचे वतनदार म्हणून 'सरदार धुळोजी मोरे' यांचा उल्लेख आढळतो. तसेच, गावात मोरे घराण्यातील वीरपुरुषांची मध्यकालीन घुमटाकार समाधीस्मारके असून गोलाकार पिंडीच्या आकाराची बारव आणि महादेव मंदिर या ऐतिहासिक वास्तू आहेत." इतिहास अभ्यासक सुमित लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जसे महाराष्ट्रात मोरे घराणे वास्तव्यास आहेत तसेच, राजस्थानमध्ये मोरी आणि कर्नाटकात मौर्य नामक परिवार वास्तव्यास असून तीनही राज्यातील हि घराणी धनगर समाजातील असून ते मौखिक माहितीनुसार स्वतःला सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे वंशज सांगतात. परंतु, त्यावर संदर्भानुसार अधिक संशोधन होणे गरजेचे आहे." 

सोहळ्याचे अध्यक्ष माजी आमदार विजयराव मोरे यांनी मार्गदर्शन करताना शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात समाजाने प्रगती करायला हवी असे मत व्यक्त केले. तसेच, मोढवे गावात विद्यार्थ्यांसाठी 'विज्ञान शाळा' सुरु करणाऱ्यास १ लाख रुपये मदत म्हणून आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन दिले. सदर सोहळ्यानिमित्त स्पर्धापरीक्षेत उत्तीर्ण उमेदवार आणि क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन मोरे घराण्यातील मयूर मोरे आणि सहकारी यांनी केले तर प्रतीक मोरे यांनी निवेदकाची भूमिका पार पाडली आणि अनुपमा शैलेंद्र मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. या सोहळ्यास आकाश मोरे, सुरेश महारनवर, दिलीप माने, पूजा कोकरे- मोरे (आरटीओ), आंतराष्ट्रीय बेसबॉलपट्टू रेश्मा पुणेकर, मुकेश मोरे वैभव मोरे महेश मोरे संपत मोरे विलास मोरे संतोष मोरे कौस्तुभ मोरे  रणजीत मोरे रणधीर मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने