दुसऱ्याच्या मैत्रिणीसोबत फिरला म्हणून युवकाची खुन.. प्रतिनिधी दत्ता पारेकर

 




पुणे: मित्र आणि मैत्रिणीसोबत तळजाई परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा दुसऱ्याच्या मैत्रिणीसोबत फिरतोस का ? असे म्हणत अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


उपलब्ध माहितीनुसार, साहिल कसबे ( वय 19 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मैत्रिणीसोबत तळजाई परिसरात फिरण्यासाठी गेलेला होता त्यावेळी तिथे तीन आरोपी आले आणि त्याने त्यांनी दुसऱ्याच्या मैत्रिणीसोबत फिरतोस का ? असे म्हणत त्याला मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्या पोटावर आणि इतरत्र वार केले आणि रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले.




गंभीर जखमी अवस्थेत असलेला साहिल याला त्याच्या मित्रांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे . दोन आरोपींची नावे स्पष्ट झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने