अक्कलकुवा तालुक्यातील आंबाबारी येथील अध्यापक शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात आनंद मेळावा साजरा




अक्कलकुवा 
अक्कलकुवा तालुक्यातील आंबाबारी येथील
अध्यापक शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात  आनंद मेळावा साजरा करण्यात आला.
        अध्यापक शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय आंबाबारी येथे संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ.मंगलाताई अरुणकुमार महाजन तसेच संस्थेचे आधारस्तंभ व स्थानिक स्कूल कमीटीचे चेअरमन आणि कॉलेज ट्रस्ट तळोद्याचे संचालक अरुणभाऊ महाजन तसेच संस्थेचे युवा नेतृत्व व न्यू.हायस्कूल तळोद्याचे उपमुख्याध्यापक अमरदिप महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने व मुख्याध्यापक यु.एच.केदार सर यांच्या अध्यक्षतेखाली आंनद मेळावा साजरा करण्यात आला.
                  सरपंच  विद्याताई तडवी यांच्या हस्ते कार्यकर्माचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला ग्रा. पं.  सदस्य  हिना तडवी,  माजी पंचायत सदस्य  मणीलाल तडवी,  जि. प शाळा आंबाबारीचे शिक्षक व विद्यार्थी  घूनशी  सोनापाटी रायसिंगपूर आणि भोयरा गावातील पालकांनी आनंद मेळाव्याचे आनंद घेतला या आनंद मेळाव्यात एकूण11 स्टॉल होते या स्टॉल ला गावातील सरपंच  श्रीमती विद्या निलेश तडवी यांनी प्रत्येक स्टॉल ला 100 रुपये प्रमाणे 1100 रुपये प्रोत्साहन पर बक्षीसे देण्यात आली  इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या मेळाव्यात पापड ; पोंगे बटाटे;  खमण; पाणीपुरी;  भेळ; उसळ ; चटपटीत पेरू; मसाला पोहे; इमली गोळी; वडापाव आणि  पाववडा भजी आदी स्टॉल होते . या उपक्रमतून सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना रोजगार ,लघुउद्योग चे माहिती उपलब्ध होईल सावता उद्योजक होण्याचे उपक्रमातून प्रेरणा मिळेल.   यावेळी   उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. एस .पी वळवी  यांनी केले तर या कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने