सिन्नर महामार्गावर विचित्र तिहेरी एसटी बस ने घेतला पेठ, चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज प्रतिनिधी सुमित गिरासे




सिन्नर
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर महामार्गावर विचित्र तिहेरी अपघात अपघातानंतर एसटी बस ने घेतला पेठ. चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची  माहिती समोर आली आहे.
       आज दिनांक आठ डिसेंबर 2022 रोजी गुरुवारी नाशिक पुणे महामार्गावर शिंदे पळसे च्या जवळ एसटी बसने दुचाकी स्वरांना फरफटत नेत पेट घेतल्याची घटना घडली असून अपघात झाल्याच्या काही क्षणामध्ये एसटी बसला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. महामार्गावर उभ्या या अपघातग्रस्त बसमधून आगीच्या झळा आणि भरपूर प्रमाणात धुर निघत होता. काही दिवसापूर्वी औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल येथे असाच अपघात घडला होता. ट्रक व खाजगी बस झालेल्या या अपघातामध्ये खाजगी बसणे घेतलेल्या पेटानंतर तेरा जणांचा हुरपळून मृत्यू झाला होता.
       आजच्या घटनेत चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र समोर दिसून येत होते. या अपघातात एसटी महामंडळाच्या एसटी बसने कागदासारखा पेट घेतला असून त्याचे लोळत उंच हवेत जात होते. नागरिकांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. ही बस राजगुरुनगर आगाराची असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने