एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण प्रतिनिधी दत्ता पारेकर

 




पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी ठीक १० वाजता प्रतिमा पुजन व आदरांजली चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यास प्राचार्य, अकॅडेमिक डीन, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे यांनी प्रतिमेचे पूजन केले व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला व आदरांजली वाहिली. यावेळी  विध्यार्थी विकास अधिकारी प्रा. जालिंदर एकतपुरे यांनी सूत्रसंचालन केले  तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामाचा सखोल आढावा दिला.यावेळी महाविद्यालयाचे प्रा.बी. एल. भालेराव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात सर्व विभाग प्रमुख, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. 

या निम्मिताने संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा सौ. अंकिता पाटील-ठाकरे आणि विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी अभिवादन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने