ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र.न.) ता.शिंदखेडा जि.धुळे येथे विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम. पी.पी महिरे -वाघ यांच्या मार्गदर्शनाने व ज्येष्ठ नवोपक्रमशील शिक्षक श्री. एन. पी. भिलाणे, श्री ए.के. सावंत, श्री. सी .झेड् कुवर , श्रीम. मंगलाताई डी. कुवर व श्री. पी. एच लांडगे यांच्या सुयोग्य नियोजनाने दाऊळ केंद्राच्या विशेष शिक्षिका श्रीम. माधुरी पंजाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक दिव्यांग सप्ताह दिनांक 3 /12/ 2022 ते 9/ 12/ 2022 पर्यंत विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या सप्ताह अंतर्गत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दोरी उडी, स्लो सायकल व गोणपाट स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम. पी.पी. महिरे- वाघ यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या श्रीम.माधुरी पंजाबराव देवकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आपली मदत कशी होऊ शकते ? व ते प्रगतीच्या शिखरावर कसे पोहोचू शकतात ? व किशोरवयीन मुलींना देखील मार्गदर्शन केले.
जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अपंगत्व आडवे येत नाही असे मत श्री एन.पी. भिलाने यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थिनी कु.भटाबाई युवराज ठाकरे (अस्थिव्यंग) व कु.रंजना न्हानभाऊ भिल (दृष्टीदोष) यांचा व आयोजित स्पर्धांमध्ये प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शालेय
साहित्य व मंगल पुष्पगुच्छ
देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देखील सर्वोच्च पदावर कसे पोहोचू शकतात? यावर विद्यालयातील ज्येष्ठ कलाशिक्षक श्री ए.के. सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चुडामन धनगर यांनी मोलाचे सहकार्य केले.
