पुणे:महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
शेतकरी देखील मोठ्या जोमात उसाची लागवड करून ऊस उत्पादन घेण्याला पसंती देतात. याचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
अनेकदा ऊस तोडणीसाठी मुकादम शेतकऱ्यांकडे पैसे मागतात.
मात्र, याबाबत आता शेतकऱ्यांना मुकादमांनी ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास मुकादम यांना चांगलाच फटका बसणार आहे.
ऊस तोडणीला आल्यास मुकादम यांनी शेतकऱ्यांकडे ऊस तोडणीचे पैसे मागितल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे.
ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास मुकादम यांच्यावर कारवाई करण्याकरता शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधावा अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर)
मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.
Tags
news
.png)