विकास महाजन*
धुळे प्रतिनिधी.... धुळे तालुक्यातील रानमाळा या गावी दिनांक 13 रोजी ग्राहक संरक्षण कायदा विषयी जनजागृती शिबिर संपन्न झाले.ग्राहक कल्यान फाउंडेशन व अभय युवा कल्याण केंद्र, धुळे संचालित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा यांच्या संयुक्त विद्यमान शाळेतील विद्यार्थ्यांना ग्राहक कायदा विषय मार्गदर्शन शिबिर संपन्न.
ग्राहकांची होणारी लूट थांबवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा विषयी जनजागृती करणे हा एक मात्र पर्याय आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील माननीय अशासकीय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाउंडेशनचे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन सर यांनी रानमाळा येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
छोट्या छोट्या गोष्टी आपण खरेदी करत असतो त्या गोष्टी खरेदी करताना ग्राहक म्हणून आपल्या अधिकार काय आहेत याविषयी आत्तापासून विद्यार्थी चौकस राहिले तर पुढे भविष्यात त्यांची फसगत होणार नाही या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील मा.अशासकीय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन सर, ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे धुळे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजेश शेलकर, कार्याध्यक्ष अडवोकेट चंद्रकांत येशिराव, महिला जिल्हाध्यक्ष एडवोकेट धनश्री येशीराव, जिल्हा सदस्य डॉक्टर वीरेंद्रसिंह गिरासे, धुळे तालुकाध्यक्ष भूषण ब्राम्हणे, उपाध्यक्ष संजय गोसावी, गावातील माझी सरपंच क्षीरसागर, मुख्याध्यापक सूर्यवंशी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
