दोंडाईचा (अख्तर शाह)
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा अॅथेलेटिक्स असोसिएशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शनाने यश संपादन केल्यामुळे त्यांची नाशिक विभागीय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
14 वर्षाआतील वयोगटात 200 मी.धावण्याच्या स्पर्धेत भावेश बागल,17 वर्षाआतील वयोगटात नोमान बेलदार, थाळी फेकमध्ये राजवर्धन गिरासे, हॅमर थ्रोमध्ये गौरेश ठाकरे, 4 x 100 मीटर रिले रेस या सांघिक स्पर्धेत नोमान बेलदार,ध्रुव महाजन, साहिल ठाकूर,भावेश वाघ यांचा संघ या सर्वांनी वरील मैदानी खेळात जिह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच शालेय मार्शल आर्टच्या कुराश स्पर्धेत मुलांच्या 14 वर्षाआतील 35 किलो वजनगटात देवेंद्र कोळी, 40 कि. वजनगटात रोहन बच्छाव, 45 कि. वजनगटात निरज पवार, मुलींच्या14 वर्षाआतील 24 कि. वजनगटात यशिका महाजन, 28 कि.वजनगटात मानसी जाधव, 36 कि. वजनगटात हर्षिता पाटील, 40 कि. गटात भाग्यश्री बडगुजर,48 कि.गटात धनश्री तेली व कनिष्का राजपूत या सर्वांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलांच्या 17 वर्षाआतील वयोगटात 40 कि. वजगटात कुशल वालेचा, 45 कि. गटात उदय चैनानीने द्वितीय क्रमांक मिळविला.17 वर्षाआतील मुलींच्या वयोगटात 44 कि. गटात शौर्या जाधव, 52 कि. गटात खुशी भामरे,63 कि. गटात दिशा चैनानी व राजनंदिनी महाले, 70 की.गटात गौरी केसवानी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर 40 कि.गटात हनिशा चैनानीने द्वितीय क्रमांक पटकावला.सर्व खेळाडूंची नाशिक विभाग स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक अजय हजारे, जितेंद्र भारद्वाज यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या विशेष कामगिरीबद्दल संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर, श्री पी. सी. शिंदे, प्राचार्य एम. पी. पवार यांनी समाधान व्यक्त केले असून विभागीय क्रीडास्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
