नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी - राजवर्धन पाटील प्रतिनिधी दत्ता पारेकर

 


    पुणे:सध्या चीनसह इतर देशामध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 ची भीती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले आहे.

   राजवर्धन पाटील म्हणाले की,' कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असुन या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काळजी घ्यावी. योग्य खबरदारीच्या आधारे हे संकट टाळता येईल.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने