अपवाद वगळता चाकरमाने कामगारांच्या विचित्रपणामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत वाढ भविष्यातील आमदारकीचे स्वप्न भंगणार दत्ता पारेकर पुणे

 


इंदापूर:- हर्षवर्धन पाटील यांच्या खाजगी ऑफिसातील  काही अपवाद वगळता पि.ए.व इतर चाकरमाने कामगारांच्या  विचित्रपणामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत वाढ ,सध्या इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जोर धरू लागल्या आहेत हर्षवर्धन पाटील यांना पॅनल प्रमुख यांनी प्रेमाने फोन केला असता मध्येच त्यांचे चाकरमाने पगारावर ठेवलेले, कामगार फोन उचलून साहेब कामात आहेत , नंतर फोन करा, एखादी ग्रामपंचायत गेली म्हणून आम्हाला काय फरक पडत नाही,साहेबांना डिस्टर्ब करू नका,असे सांगताना पहावयास मिळत आहेत, मग हर्षवर्धन पाटील तुम्हीच सांगा तुम्हाला कामगार महत्त्वाचे आहेत की मतदार..? कामगारांच्या म्हणण्यावर जर चालत राहिला तर भविष्यातील आमदारकीची स्वप्न भंग होऊ शकते, लोकांची जर तुम्हाला गरज नसेल तर लोकांनाही आज तुमची गरज नाही अशी तालुक्यात चर्चा आहे पूर्वी काही दिवसापूर्वी काँग्रेस भवन मधून आपला कारभार सुरळीत चालत होता कारण त्यावेळी आपुलकी गोडवा माणुसकी होती तिथले कामगार हे कामगार नसून ते हर्षवर्धन पाटील यांच्यावर प्रेम करणारी एक टीम होती, पण आता काही काम चुकार व बेताल वक्तव्य करणारे हलकट कामगार कामावर ठेवल्यामुळे आपल्या मतदारासमोर तरी व्यवस्थित वागताना दिसत नाहीत,आपल्या जवळील जिवाभावाची, बालमित्र पणा पासूनची मानसं याच टिनपाट व अकलशुन्य कामगारांकडून दुखावली गेली म्हणून ती बाहेर आहेत,या कामगारांनी 

 पुन्हा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करायचीच सुपारी तर घेतली नाही ना,विरोधकांकडून,  पदाधिकाऱ्यांना सुद्धा उडवा उडवीची उत्तरे दिली जातात हर्षवर्धन पाटील हे एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकार मधील मंत्र्यांची जवळीकता करून  जनतेच्या हित उपयोगी कामासाठी रात्र  दिसत झटत आहेत पण इंदापूर तालुक्यात ठेवलेली काही चाकरमानी नोकरीस ठेवलेले कामगार हे ज्याचं खाऊ मीठ त्याची आणावी नीट असे वागतात आपला येथे अपप्रचार करताना दिसत आहेत हर्षवर्धन पाटील यांनी वेळीच ओळखून घ्यावी व अशा कामगाराच्या पृष्ठभागावर लात घालून हाकलून द्यावी पायातील चप्पल पायात चांगली दिसते ती दारात सोडावी ती देव घरात नेहत नाहीत,जर पायात घातलेली चप्पल  आपण डोक्यावर उचलून घेतली तर लोक म्हणतील वेड लागले, हर्षवर्धन पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आज कामगारांच्या व या नोकरशाहीच्या हुल्लडपणामुळे बाजूला जाताना दिसत आहेत गावागावात तेढ निर्माण करण्याचे काम हे तुमच्या जवळील चाकर माने कामगार करत आहेत असा प्रसंग जर बारामती तालुक्यातील अजित पवार यांच्या विषयी घडला असता तर अशा कामगारांची अवस्था काय केले असते हे न बोललेलं बरं, पण हर्षवर्धन पाटील यावर काय निर्णय घेणार ....?जनतेत चर्चा, पूर्वी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला सुद्धा हेच कामगार जबाबदार आहेत कारण यांनीच गोपनीय माहिती बाहेर पुरवली घर का भेदी लंका ढाहे अशी अवस्था निर्माण झालेली आहे, असं जर चालत राहिलं तर हळूहळू आपण बांधलेली मोट निसटू शकते कारण एकेक कार्यकर्ता बाजूलाच चाललेला आहे कार्यकर्ते जर बाजूला गेले तर हे उपटसुंदे कामगार घेऊन हर्षवर्धन पाटील काय करणार अजूनही वेळ गेलेली नाही

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने