*वरवाडे गावात शिरपुर वरवाडे नगर परिषदतर्फे स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिम अंतर्गत स्वच्छता संकल्प अभियान सबंधी मिटींग संपन्न*

   


            शिरपूर—शिरपुर वरवाडे नगरपरिषद तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2023 चे औचित्य साधून शिरपुर वरवाडे नगर परिषद प्रशासक मा. प्रमोद भामरे ,माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल , शि.व.न.पा. माजी नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल,शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष मा.भुपेशभाई पटेल,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण शिरपुर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.तुषार नेरकर साहेब,प्रशासकिय अधिकारी संजय हासवाणी, अभियंता माधवराव पाटील माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी ,माजी नगरसेवक दिपक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्व्हेक्षण स्वच्छता संकल्प अभियान मोहिम वरवाडे वार्ड नं.१३ संपुर्ण परिसर स्वच्छ कसा होईल या  विषयी दि.२३/१२/२०२२ रोजी सायं.५ वा. महात्मा ज्योतिबा फुले चौक वरवाडे येथे मिटींग आयोजीत करण्यात आली होती. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार आशाबाई पवार यांच्या हस्ते अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा पवार यांनी केले तर शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंखे यांनी स्वच्छता संकल्प अभियानाचे महत्त्व पटवून दिले व त्याच बरोबर जुने  चप्पल बूट यांचे संकलन करून गरजू विद्यार्थ्यांना नवीन चप्पल व बूट देण्याबाबत उपक्रमा बद्दल माहिती दिली.त्यात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत उद्दान पर्यवेक्षक सागर कुलकर्णी यांनी सर्व जनतेस स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले  तसेच (देवमढी) जय मरी माता मंदीर चौक  येथे देखील स्वच्छतेबाबत महत्त्व पटवून सांगण्यात आले तसेच कचरा हा घंटागाडीत टाकावा  जाहीर आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात प्लास्टिक बंदी संदर्भात बॅचेस वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात महात्मा फुले पुतळा परिसरातील महिला वर्ग ,नाना माळी,भालेराव माळी, पुंडलिक माळी,शंकर धोबी,लक्ष्मण महाराज हजर होते वासुदेव देवरे व आशाबाई पवार मॅडम यांनी   आपले मनोगत व्यक्त केले   जसे आपण आपले शरीर स्वच्छ ठेवतो त्या प्रमाणे आपण आपले घर,गल्ली,परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न ठेवु  सर्व महिला पुरूषांनी स्वच्छते विषयी शपथ घेतली व घोषणा दिल्या    शिरपुर वरवाडे  नगरपरिषदेच्या या उपक्रमांत आपला मौलाचा सहभाग नोंदवून आपला प्रभाग/वार्ड स्वच्छ व सुंदर राखण्यास सहकार्य  कसे होईल यांच्या उपाय योजना  करु  या कार्यक्रमास संतोष महारु माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी भगवान माळी,वसंत माळी,महादु माळी,प्रकाश माळी,पिंताबर मोरे,हिंम्मत माळी,मोहन माळी,पप्पु बारी,श्याम पाटील,जितेंद्र माळी,भैय्या माळी,डाॅ.भोजने,सुभाष माळी,पुंडाआबा, समाधान माळी,अशोक माळी,भिका माळी,नाना माळी ,अधिकार माळी तसेच या सर्व स्वच्छ सर्वक्षेषणात  विभाग प्रमुख अहिरे ,प्रज्ञशील निकम,मनोहर थोरात,श्रीजी इवेन्ट मॅनेजमेन्ट सदस्य ज्योती चौधरी,ज्योती पाटील,संगिता आखाडे,सोनवणे विजय,रोशन माळी,मेहुल धाकड,मयुर धाकड व आशा वर्कर वैशाली बुवा,रुपाली बुवा यांचे सहकार्य लाभले  संतोष माळी यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने