वृत्त प्रतिनीधी-: धनंजय गाळणकर
दोंडाईचा येथील दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात दि १ डिसेंबर २०२२ रोजी,संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. पी गिरासे यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ जेष्ठ नागरिक श्री.पी.जे.फुलहारी यांच्या अध्यक्षतेत जेष्ठांसाठी मासिक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. सदर मासिक मेळाव्यात, रनाळे येथील जेष्ठ नागरिक व भगवद गीतेचे गाढे अभ्यासक श्रीमान रविंद्र देवराम चौधरी यांचे भगवत गीता व उपनिषद या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजीत केले होते.श्री.चौधरी यांनी भगवद गीतेचे तत्वज्ञान अत्यंत सुलभ व सोप्या भाषेत, विवीध दृष्टांत देवून बोधात्मक शैलीत मांडले. सभागृहाचे वातावरण संपूर्ण "गीतामय" झाले होते.सदर मेळाव्यात दोंडाईचा परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री.सुरेश ढोमन पाटील आणि प्रमुख वक्त्यांचा परिचय कोषाध्यक्ष सुरेश चौधरी यांनी तर कार्यक्रमाचा समारोप व आभार संस्थेचे विश्वस्त मंडळाच्या सदस्या सौ.शकुंतला व्ही. बागल यांनी मानलेत.
.png)