किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित के व्ही टी आर सी बी एस ई स्कूल शाळेच्या खेळाडूंनी धुळे जिल्हा क्रीडा कार्यालय धुळे आयोजित जिल्हास्तरीय ११ वर्षाआतील मुलींच्या रोलर स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत स्पर्धेत सुवर्णपदक, रजतपदक व कांस्यपदक संपादन केले. प्रथम क्रमांक कुमारी साची मुकेश हेडाऊ, द्वितीय क्रमांक कुमारी वेदिका सुधीर भूत तर तृतीय क्रमांक कुमारी अश्विनी कृष्णा पावरा या खेळाडूंनी संपादन केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषारजी रंधे व सचिव श्री निशांतजी रंधे यांच्या हस्ते सदर खेळाडूंना सर्व विद्यार्थी व शिक्षकांसमोर गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक श्री के.डी.बच्छाव, श्री भैय्या माळी, शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश चोपडे समन्वयक श्री सागर वाघ, श्री शेखर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेचे स्केटिंग प्रशिक्षक श्री दीपक पवार यांचे सर्व खेळाडूंना प्रशिक्षण लाभले. तर स्पर्धेतील यशासाठी संस्थेचे क्रीडा प्रा.श्री राकेश बोरसे, श्री नूर तेली, कु. नयना माळी, यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेच्या क्रीडा विभागाच्या उल्लेखनीय उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषारजी रंधे, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री आसाराम जाधव,सचिव श्री निशांतजी रंधे, खजिनदार सौ आशाताई रंधे, संचालिका सौ. सीमाताई रंधे, संचालक श्री राहुलजी रंधे, श्री रोहितजी रंधे, श्री शशांकजी रंधे, क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील, संस्थेचे सर्व
व्यवस्थापक,प्राचार्य ,मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक तसेच संस्थेच्या इतर मान्यवरांनी व परिसरातील पालकांनी भरभरून कौतुक केले.
