महिलांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श घेवून आपली वाटचाल करावी - शांता कुमारी




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२२ सोहळा संपन्न; आदर्श "सभापती" पुरस्काराने पुष्पा रेडके सन्मानित

पुणे:- ज्या काळात पुरुषसत्ताक पध्दती असताना सुध्दा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कसे करावे आणि महिलांंनी सामर्थ्यशाली कसे असावे? याचे आदर्श उदाहरण स्थापित केले होते. अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श घेवून आजच्या महिलांनी आपली वाटचाल करावी. जेणे करुन सशक्त महिला या  समाजाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्नशिल राहतील असे प्रतिपादन आरएसएस महिला राष्ट्रीय महिला प्रमुख  राष्ट्रसेविका समिती प्रमुख संचालिका श्रीमती शांताअक्का कुमारी  यांनी केले. त्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होत्या.
           दि. 7 डिसेंबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी चिंचवड, पुणे येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी धर्मपीठ प्रस्तुत, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2022 हा सोहळा पार पडला. आर एस एस महिला राष्ट्रीय अध्यक्षा तथा राष्ट्रसेविका समिती प्रमुख संचालिका श्रीमती शांताकुमारी जी यांच्या हस्ते व मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक व पर्यटन मंत्री श्रीमती उषा सिंह ठाकुर, देवी अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या सचिव श्रीमती सरिता राजुरकर,  सागर धापटे पाटील आयोजक पुण्यश्‍लोक  अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार समिती, कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुजाताताई पालांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 
            या पुरस्कारार्थीमध्ये गुरुमता ब्रह्मीदेवी स्वामीजी  महिला सशक्तिकरण, गोवा अंजली ओम बिर्ला (IRPS अधिकारी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या),    निधी कामदार ( मा.उपमुख्यमंत्री यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी), राधिका कृष्ण अष्टेकर (प्रमुख अष्टेकर ज्वेलर्स),     पुष्पाताई रेडके (उत्कृष्ट महिला सभापती.इंदापुर),  मधुलिका देवगोजे कदम (आय आर एस अधिकारी, भारत सरकार), सेवानिवृत्त मेजर प्राजक्ता देसाई (एअर फोर्स), डॉ. निकिता होळकर (आरोग्यसेवा), कु. साक्षी होळकर (उत्कृष्ट गायिका), दीपिका नाचण ( समाजसेविका, इंदोर), नीताताई अग्रवाल. (लातूर), शितल वायाळ,महिला कर सल्लागार, बारामती.), निहारिका खोंदले (मुंबई), सुलभा कोपनर  (सातारा), सुरज वारकरे (उदगीर), शुभदा रेड्डी  (समाजसेविका) यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
           अध्यक्षीय भाषणात मंत्री उषासिंह ठाकूर यांनी महिला सशक्तीकरण व सुसंस्कारामुळे समाजात होणारे सकारात्मक परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. संस्कारीत तरुण पिढी व महिला हेच भारताचे उज्वल भविष्य आहे असे मत त्यांनी मांडले.यावेळी सभागृहात मान्यवरांसोबतच महिला, विद्यार्थी व तरुणांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे निवेदन दूरदर्शन वाहिनीवरील निवेदिका व हॅलो सखी फेम पुजा थिगळे यांनी केले.


महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  इंदापूर तालुक्याच्या माजी पंचायत समिती सभापती पुष्पा रेडके यांनाही सन्मानित करण्यात आले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कारोना काळात ही पंचायत समितीच्या माध्यमातून रूग्णांना फार मोठी मदत मिळवुन दिली .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने