आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील 12 वी वाणिज्य शाखेची दिक्षिता गुरव हिने नाशिक विभागात मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याने पारितोषिक देवून सत्कार



 

शिरपूर : शहरातील आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील 12 वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी दिक्षिता प्रमोद गुरव या विद्यार्थिनीने नाशिक विभागात मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याने तिचा 10 डिसेंबर 2022 रोजी पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयातील 12 वी वाणिज्य शाखेतून दिक्षिता प्रमोद गुरव हिने नाशिक विभागात मराठी विषयात 100 पैकी 97 गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावल्याचे नुकतेच नाशिक मंडळाकडून जाहीर करण्यात आले. नाशिक बोर्ड कडून अमळनेर जि. जळगाव येथील खान्देश शिक्षण मंडळचे चिटणीस पी. एस सेनानी यांच्या तर्फे श्रीमान कै. प्रताप शेठजी स्मृती पारितोषिक जाहीर केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला.

तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील, पर्यवेक्षक.एन.ई.चौधरी, सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी कौतुक केले.

तिच्या यशासाठी मराठी विषय शिक्षक एस.आर.पाटील व श्रीमती आर.ए.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने