बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व शहरातील विविध शाळांमधील मुलांसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, खामगांव रोड, नंदुरबार येथे 12 व 13 डिसेंबर,2022 रोजी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्घाटन सोमवार 12 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते होणार आहे. यादिवशी विविध क्रीडा स्पर्धा, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त बळवंत निकुंभ, जिल्हा क्रीडा संघटक ईश्वर धामणे याची उपस्थिती राहणार आहेत.
मंगळवार 13 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. श्रीमती निता देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कारागृह अधिक्षक आर.आर.देशमुख उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 2 वाजता समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.व्ही.हरणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, बाल कल्याण समिती सदस्य ॲड.श्रीमती सीमा खत्री, श्रीमती.मिनाक्षी देसले, श्रीमती. पुष्पलता ब्राम्हणे, डॉ. साहेबराव अहिरे, तसेच बाल न्याय मंडळाचे सदस्य नितीन सनेर, श्रीमती ज्योती कळवणकर हे उपस्थित राहणार आहे. तरी या चाचा नेहरु बाल महोत्सवाचा नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी केले आहे.
Tags
news
.jpeg)