राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या वक्तव्याच्या शिरपूर शिवसेने कडून निषेध व आंदोलन

 




शिरपूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्द्ल आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोशारीच्या निषेधार्थ  शिरपूर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

 आज दिनांक :-२१ नोव्हेंबर रोजी

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या* बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी व सुधाशू त्रिवेदीच्या शिरपूर तालुका व शहरच्या वतीने भगतसिंग कोशारीच्या निषेधार्थ घोषणा देत प्रतिमा जाळून शिवसेना शिरपूर शहर येथे पाच कंदील जवळ निषेध करण्यात आले.



राज्यातील सर्वाधिक मोठ्या संविधानिक पदावर असताना देखील भगतसिंग कोशियारी यांच्याकडून वारंवार महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुष व समाजभूषण असणाऱ्या व्यक्तींच्या हेतू पुरस्कृत अपमान करण्यात येत आहे. यापूर्वी मराठी माणसाला देखील त्यांनी कमी लेखण्याच्या प्रयत्न केला आहे. आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत राजकीय नेत्यांची तुलना करून त्यांनी एक नवा वाद निर्माण केला आहे. सध्या कोषियारी यांचे वक्तव्य हे विषारी होत असून त्यातून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जात असून राज्यातील आदर्श व राष्ट्रपुरुषांच्या देखील अपमान होत आहे. कोणी कितीही मोठा पदावर बसला असला तरी महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप असल्याने कोणताही नागरिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमान सहन करणार नाही आणि अशा संकुचित मानसिकतेच्या लोकांना व त्यांना समर्थन करणाऱ्या राजकारणांना राज्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या सर्व बाबींचा निषेध शिरपूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने करण्यात आला असून निषेध आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी भरतसिंग राजपूत,विभाभाई जोगराणा,अत्तरसिंग पावरा, योगेश सूर्यवंशी,देवाजी पाटील, अभय भदाणे,मंगलसिंग भोई,जितेंद्र पाटील,पिंटू शिंदे,विजय चव्हाण,दिनेश गुरव,सचिन चौधरी, नारायण गवळी,प्रशांत पाटील,स्वप्निल जमादार,जावेद शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने