आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त वेतनाचा सात दिवसांत अहवाल द्या प्रतिनिधी दत्ता पारेकर

 



पुणे:आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हक्‍काचे अतिरिक्‍त वेतन अद्यापही अदा केलेले नाही. त्या बाबतची माहिती सात दिवसांत देण्याची सुचना अनुसुचित जाती आयोगाने आयुक्‍त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. महापालिका आयुक्तांना नोटीस बजावत आयोगाने ही माहिती मागविली असून याबाबत ऍड. सागर चरण यांनी याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत आयोगाने ही नोटीस पाठविली आहे.


सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त वेतन दिले जाते. यंदा महात्मा गांधी जयंती ते घटस्थापनापर्यंत काम करणाऱ्या कामगारांना दिवाळीपुर्वी अतिरिक्‍त वेतन देणे अपेक्षीत होते. मात्र काही क्षेत्रीय कार्यालय वगळता इतर क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. कामगारांना ऐन दिवाळी सणालाच हक्‍काच्या वेतनापासून वंचित रहावे लागले. त्या बाबत ऍड. सागर चरण यांनी अनुसुचित जाती आयोगाकडे याचिका सादर करत कारवाईची मागणी केली.

आयोगाने चरण यांच्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्‍त शेखर सिंह यांना नुकतीच रोजी नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, संविधानाच्या कलम 338 नुसार या तक्रारीची आयोगाकडून दखल घेऊन संबंधीत प्रकरणाची तपासणी केली जाणार आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधीत कामगारांच्या वेतनाबाबत काय कार्यवाही केली, याचे उत्तर आयोगाकडे पाठवावे. आयोगाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पालिका प्रशासन अडचणीत आले असून आयोगाकडून पुढील कार्यवाही काय केली जाते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने