लाल बावटाच्या आंदोलनामुळे बांधकाम विभागामार्फत अपघात स्थळी मोरी बांधकाम निविदा

 

 
शिरपूर - भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे 3 ऑक्टोबर 2022 रोजी शिरपूर चोपडा रोडवर तरडी गावाजवळ  जगन्नाथ एकनाथ पाटील यांच्या शेताजवळ अपघात पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांचा  ताफाअडवण्यात येऊन कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते. निवेदनाचे   दखल घेऊन मंत्री महोदयांनी जागेवरूनच बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित काम करण्याचे निर्देश दिले होते ् अनुषंगाने अपघात प्रवण स्थळी मोरी बांधकाम करण्याचे निविदा मंजूर करण्यात आली असून 38 लाख रुपयाचे काम बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे.. आंदोलनामुळे सदरील प्रश्न मार्गी लागला असून लवकरच काम सुरू होणार आहे त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे होणारे संभाव्य नुकसान थांबणार असून वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे  नागरिकांना होणारा त्रास निश्चितच थांबणार आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य एडवोकेट हिरालाल परदेशी, भाकप तालुका सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील, धुळे जिल्हा भाकप सेक्रेटरी कॉम्रेड वसंत पाटील. कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड कमलाकर पाटील, कॉम्रेड अर्जुन कोळी,.     धुळे जिल्हा किसान सभा अध्यक्ष डॉक्टर किशोर सूर्यवंशी,  तोंदे शाखा सेक्रेटरी, कॉम्रेड सुरजमल जैन, कैलास पाटील, कवर लाल कोळी, आदी  कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा,.   शेतमजूर संघटना कार्यकर्त्यांनी व परिसरातील जागृत नागरिकांनी सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने