शिरपूर तालुक्यातील आढे येथील आयुर्वेदिक दवाखाना सुरु करावा,अशी मागणी क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेने केली आहे.यासंदर्भात जि.प.धुळे येथील आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम वानखेडे यांनी आश्वस्त केले कि,येत्या दोन तीन दिवसात दवाखान्यात डॉक्टर यांची नियुक्ती करतो.यावेळी पोलीस पाटील तथा संस्थेचे अध्यक्ष राजकिरण राजपूत,सचिव डी. एल.राजपूत यांना निवेदन देतेवेळी सांगितले.
आमच्या गावातील आयुर्वेदिक दवाखान्याचे बांधकाम पूर्ण होऊन सवा वर्ष झाले तरी दवाखाना चालू करण्यात आला नाही.दवाखाना चालू करण्यासाठी दि.४/६/२०२१ रोजी गटविकास अधिकारी,पंचायत समिती कार्यालय शिरपूर येथे क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.निवेदनाची व विविध वृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन दि.७/६/२०२१ रोजी तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती शिरपूर यांच्याकडून संस्थेला आयुर्वेदिक दवाखाना चालू करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते.दोन तीन दिवसानंतर आठवड्यातून किमान चार दिवस दवाखाना संस्थेच्या मागणीप्रमाणे चालू करण्यात आला.
एक महिना आयुर्वेदिक दवाखाना सुरळीत चालू होता.दवाखान्याचे कंपाउंडचे काम चालू झाल्याने दवाखान्यात डॉक्टर व रुग्णांना येण्या जाण्यास अडचणीचे होत असल्याने दवाखाना एक महिना बंद करण्यात आला.कंपाउंडचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन महिने दवाखाना सुरळीत चालू करण्यात आला.त्यानंतर आता सुमारे सवा वर्षांपासून दवाखाना बंद आहे.दि.३/११/२०२२ रोजी तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे निवेदन देऊन परत दवाखाना चालू करण्याची मागणी करण्यात आहे.परंतु दवाखाना आजपर्यंत बंद आहे.यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.कोरोना व्हायरसचे प्रमाण कमी होत आहे.आता हिवाळ्यात ऋतू बदलामुळे साथीचे आजार वाढत आहेत.अशातच गावातील आयुर्वेदिक दवाखाना बंद असणे ही तालुका व गावासाठी खेदाची बाब आहे गावात कोणत्याही प्रकारचे स्थानिक डॉक्टर नाहीत.यामुळे तालुक्याचा ठिकाणी रुग्णांना उपचार घेण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागत आहे.गावातील आरोग्याची समस्या दवाखाना सुरु झाल्यास कमी होईल.गावातील लोकांचे आरोग्य सर्दूढ राहण्यास मदत होईल.गावातील आयुर्वेदिक दवाखाना लवकरात लवकर पूर्ववत करावा.अशा प्रकारची मागणी क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्था,आढे ता.शिरपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
