धनगर आरक्षणासाठी इंदापूर मध्ये भव्य मोर्चा येळकोट येळकोट जय मल्हारच्या आवाजाने परिसर दणाणला प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: इंदापूरात धनगर समाजाला आरक्षण मिळावे या  मागणीसाठी  सोमवार दिनांक 21- 11- 2022 रोजी धनगर समाज बांधवांनी मालोजीराजे चौक ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य दुचाकी रॅली  व मोर्चाचे चे आयोजन केले होते. हा मोर्चा धनगर ऐक्य परिषदेने आयोजित केला होता. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय धनगर बांधव उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा प्रशासकीय भवन येथे पोहोचला. पारंपारिक वेशभूषा गजी ढोल व येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणाने प्रशासकीय भवन व परिसर दणाणुन सोडला हा मोर्चा प्रशासकीय भावना समोर पोहोचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले‌.

 डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी धनगर समाजाला आरक्षण कसे मिळेल याबद्दल समाज बांधवांना मार्गदर्शन केले. व इथून पुढे आरक्षणाचा लढा कशा प्रकारे उभा केला जाईल. हे त्यांनी आपल्या भाषणातून मांडले. या रॅलीमध्ये युवकांची संख्या लक्षणीय होती. राज्य सरकारने पाच डिसेंबर पर्यंत धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास पाच डिसेंबरला उजनी जलाशयात 5000 धनगर बांधवांसह जलसमाधी घेणार असा इशारा डॉक्टर तरंगे यांनी  यावेळी सरकारला दिला. व उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे व इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटिल यांना  निवेदन देण्यात आले.

 यावेळी महेंद्र रेडके हेमंत वाघमोडे संजय रुपनवर अशोक चोरमले हिरालाल पारेकर विशाल मारकड कुंडलिक कचरे विजय वाघमोडे  विष्णु पाटिल अमोल तोरवे मोरेश्वर कोकरे  दिलीप भिसे अमोल करे बापु पारेकर अक्षय हेगडकर  व इतर समाज बांधव उपस्थित होते. या मोर्चाचे प्रस्ताविक आप्पा माने यांनी केले व सुत्रसंचलन संतोष नरूटे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने