शिरपूर - दि. ८/११/२०२२ रोजी, लोकनेत्या खासदर, संसदरत्न मा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अपशब्द व बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध व मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करणे बाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी धुळे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज उत्तमराव महाजन यांच्या नेतृत्वात शिरपूर येथे शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले व त्या संदर्भातील निवेदन मा. उपविभागीय अधिकारी, शिरपूर तसेच मा. पोलीस निरीक्षक शिरपूर यांना सादर करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी धुळे ग्रामीण व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने निषेध नोंदवीत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व कार्यकर्त्यांचे श्रद्धा स्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सुकन्या संसदरत्न लोकनेत्या मा. खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी परिवाराच्या भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या आहेत. सदर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करून एका महिलेला अशा प्रकारे शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही.
आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. स्त्रीत्वाचा आदर करून स्त्री सन्मानाचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाईच्या लेकींचा महाराष्ट्र म्हणून अभिमानाने गौरविला जातो.
राज्यातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार सारखे जबाबदार पदावरील व्यक्ती महिला शक्तीचा सन्मान न करता अपमान करण्याचे काम जर सातत्याने करत असतील तर त्यांच्या पदाचा राजीनामा सध्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य यांनी त्वरित घेउन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. अन्यथा राष्ट्रवादी परिवार तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी धुळे (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज उत्तमराव महाजन यांनी केले.
या प्रसंगी डॉ. मनोज उत्तमराव महाजन जिल्हाध्यक्ष –रा.यु.कॉ.पा. धुळे यांचे सह जेष्ठ नेते श्री. रमेश आबा करंकाळ, श्री. हेमराज राजपूत, श्री. दत्तू दादा पाडवी, एडहोकेट श्री. नरेंद्र करंकाळ. अशफाक सय्यद, श्री. युवराज पाटील, श्री. परेश शिंपी, श्री. उदय जाधव, श्री. इम्रान शेख, श्री. गौरव पाटील , श्री. विशाल खडसे, श्री. लीलाबाई पावरा , भटीबाई पावरा , शोभा पावरा, फिरीलाल पावरा, शेवला देसले, रायमल पावरा, हिरालाल पावरा, बजेरिया पावरा, लखडू पावरा, रमेश पावरा, कुंवरसिंग पावरा, लखन पाटील, उमेश शिंदे, गणेश मोरे, प्रज्ञेश मोरे, भूपेश भोई, चेतन पाटील, मोहन पावरा, नानसिंग पावरा, सुनिता वळवी, रिझवान बेग, वाजीद मिर्झा, खान जब्बार, शेख नदीम, यश सूर्यवंशी, उबेद शहा, शारुख पठान, जाकीर मोहम्मद यांच्यासह असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थितीत होते.
