नाशिक=आज दिनांक 23/11/2022 बुधवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय निवेदन नाशिक विभागाचे उपायुक्त श्री.रमेशजी काळे साहेब यांना देण्यात आले..
निवेदनाचा आशय असा आहे की गायरान जमिनीवरील सरसकट सर्व अतिक्रमणे येत्या 31डिसेंबर 2022 पर्यंत निष्कसित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यभरात खळबळ उडाली आहे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटीस बजावण्यात आल्या आहेत या निष्कासनाच्या कारवाई करण्यापुर्वी सर्व प्रशासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत 2011साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे गायरान जमिनीवरील अनुसूचित जाती जमातीचे अतिक्रमण शाळा,दवाखाने,आणि शेती वगळून अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत त्या निर्देशाचे पालन करुन अतिक्रमण निर्मूलन ची कारवाई करताना दलितांवर अन्याय होता कामा नये याची काळजी राज्य सरकारने घ्यावी..
याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,रिपाई आयटीसेल नाशिक जिल्हा अध्यक्ष आकाशभाऊ घुसळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना पगारे, शिवसेनेचे शाखा प्रमुख सागरभाऊ मोरे, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते कुणालभाऊ साळवे, मनसेचे युवा नेते प्रमोदजी जाधव, आंबेडकरी चळवळीतील युवा नेते सुरेशभाऊ जाधव, जिल्हा नेते किशोरभाऊ आहिरे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
Tags
news
