मोटर सायकल चोरासह सहा मोटरसायकली जप्त, विसरवाडी पोलिसांची कारवाई नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




नवापूर तालुक्यात मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं.दिवसागणिक मोटरसायकल चोरी जात असल्याने याला आळा घालण्यासाठी विसरवाडी पोलीसांनी धडक कारवाई करत मोटरसायकल चोरीतील एक आरोपीस जेरबंद करत ६ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीने सदरच्या मोटरसायकल विसरवाडी, खांडबारा, निजामपूर, ताहाराबाद या भागातून चोरल्या असल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती विसरवाडी पोलिसांनी दिली आहे. 


नवापूर तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा परिसरात होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचे वाढते प्रमाण व घटनेचे गांभीर्य पाहता नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विसरवाडी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांना घटनेबाबत व चोरट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर मोटरसायकल चोरीच्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, पोकों भोजराज धनगर, लिनेश पाडवी, चालक पोलीस नाईक राजु कोकणी व पोलिस कॉन्स्टेबल विशाल गावीत यांनी विसरवाडी व खांडबारा गावातील व इतर इसमांना विचारपुस केली. तसेच गोपनिय बातमीदारांकडुन माहिती काढून संशयित आरोपी बाळा छोटीराम गायकवाड, वय 21 वर्षे, रा. वरपाडा पो. पिंपळगांव, ता. साक्री जिल्हा धुळे यास शिताफीने ताब्यात घेतले.

 सदर आरोपीला ताब्यात घेता पोलीसांनी खाक्या दाखविताच आरोपीने विसरवाडी येथिल मज्जित गल्ली व खांडबारा आझाद मेडिकल परिसरातील अशा विविध ठिकाणाहून चोरलेल्या मोटरसायकल सह धुळे जिल्हयातील निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील छडवेल येथील तसेच नाशिक जिल्ह्य़ातील ताहराबाद येथील एका शेतकरी यांची जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गावातुन गेलेली गाडी काढुन दिल्याने त्या सदरील आरोपीने  चोरल्या बाबतीत पोलीसांना कबुली दिल्याने पोलीसांनी त्याकडुन एकुण 06 मोटर सायकली जप्त केल्या असुन सदर आरोपीत याने सोशल मिडीया वर असलेले व्हिडीओ पाहुन मोटरसायकल चोरी करण्याचे प्रशिक्षण घेतले असले बाबत माहिती दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने