प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीची 2022 ते 2027 या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध





माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी मर्यादित शिरपूर या संस्थेची 2022 ते 2027 या कालावधीसाठी सर्व 17 जागांसाठी संचालक बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघ :

भूपेशभाई रसिकलाल पटेल (शिरपूर), जनार्दन तानाजी पाटील (भाटपुरा), संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत (अहिल्यापूर), नामदेव श्रावण चौधरी गुजर (वाडी बु.), रमेश बन्सीलाल कोळी (होळनांथे), जगतसिंग आनंदसिंग राजपूत (जातोडा), भरत भिवसन पाटील (बलकुवा), आशिष जयराम चौधरी (शिरपूर), संदीप शालिक देवरे (वरवाडे), अजितकुमार जीवनलाल शाह (शिरपूर), वासुदेव देवराम पटले (पाटील) (मांजरोद).


बिगर कापूस उत्पादक मतदारसंघ : गोपाल किसनलाल भंडारी (शिरपूर).


अनुसूचित जाती जमाती संचालक : सत्तारसिंग दुर्गा पावरा (रा. हिंगोणीपाडा पो. लौकी ता.  शिरपूर).


महिला संचालक रंजना रवींद्र गुजर (खर्दे बु. पो. उंटावद), मेघा राजेंद्र पाटील (शिरपूर).


इतर मागासवर्गीय संचालक प्रभाकरराव तुकाराम चव्हाण (शिरपूर).


भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग :

सुदाम नत्थू भलकार (तऱ्हाडी त. त.).


याप्रमाणे प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी केली आहे.


सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल व अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने