रेशनिंगच्या माल विक्री करणाऱ्या बेकायदेशीर वाहनधारकांवर व त्यांच्या बचाव करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आमरण उपोषण




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील मौजे हिसाळे येथे रेशनिंगच्या माल विकणाऱ्या वाहनास रंगेहात पकडून महसूल विभागाच्या ताब्यात देऊन देखील ठोस कारवाई न झाल्याने सदर वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी धुळे यांना दिलेल्या निवेदनाच्या आधारे तक्रारदार विनोद छगन करणकाळ व त्यांचे साथीदार हे दिनांक 17 /10 /2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे आमरण उपोषणास बसले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी तालुक्यातील हीसाळे या गावात दिनांक १५/७/२०२२ 22 रोजी गावात येऊन रेशनिंगच्या माल खरेदी करणाऱ्या वाहनांना रंगेहात पकडून व महसूल अधिकाऱ्यांना सूचना देऊन पुरवठा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून वाहन हे पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले होते. याबाबत महसूल विभागाने चौकशी करून अहवाल सादर केला आहे. तर पकडण्यात आलेल्या वाहनधारकांनी आम्ही किराणामाल विक्रेता असून गहू व तांदूळ घेऊन त्या बदल्यात किराणामाल देतो असा जबाब लिहून दिला आहे. मात्र तक्रार करता यांनी सदरच्या माल हा रेशनच्या माल असून गावातील रेशन लाभार्थ्यांकडून माल विकत घेताना यांना रंगेहात पकडण्यात आले आहे असा आरोप केला आहे.
मात्र सदरच्या प्रकरणात चौकशी करून दोन दिवसानंतर सदर गाड्या सोडून देण्यात आल्या या प्रकारावरून तक्रारदार यांनी आक्षेप नोंदवला असून सदर वाहनधारकांकडे किराणामाल विक्रीचा कोणताही परवाना नाही या परिसरात शेतकऱ्यांची तांदूळ ची लागवड होत नसल्याने माल विक्रीच्या देखील विषय येत नाही, त्यामुळे घाई घाईने तपास करून या वाहनधारकांना सोडून देण्यात आले असा आरोप करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी तक्रारदार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने