शिरपूरात विश्व कल्याणासाठी भव्य शतचंडी महायज्ञ संपन्न, भूपेश भाई पटेल यांच्या हस्ते प्रधान संकल्प पूजा



शिरपूर ( प्रतिनिधी) श्री ब्राह्मण समाज शिरपूर व ब्रह्मशक्ती युवा मंच  आणि श्री ब्राह्मण सभा महिला मंडळ शिरपुर  यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर शहरात 8 ऑक्टोंबर शनिवार रोजी श्री पाताळेश्वर मंदिराच्या गॅलरीत  भव्य शतचंडी महा यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक  अनुष्ठानासह मंत्रोच्चारात विश्व 

 कल्याणासाठी,  मानव जातीच्या उत्थानासाठी, समाजात बंधुभाव सलोखा नांदण्यासाठी शनिवार दिनांक 8 ऑक्टोंबर सकाळी  प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन, शिरपूरचे उपनगराध्यक्ष व  श्री खालचे गाव बालाजी संस्थानचे अध्यक्ष भूपेश भाईपटेल यांनी सौ. कृतीबेन पटेल यांच्यासह सपत्नीक प्रधान संकल्प पूजा  केली. दिवसभर पूजा अर्चना धार्मिक विधी विधान पार पडल्यावर सायंकाळी शतचंडी महायज्ञाची पूर्णाहूती  व आरती करण्यात आली. यावेळी भाविकांना प्रसाद ही वितरित करण्यात आला.

 याप्रसंगी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री राजगोपाल भंडारी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष हेमंत पाटील, श्री बालाजी संस्थान खालचे गावचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील यांच्यासह शहरातील सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. डॉक्टर्स क्लब शिरपूर तर्फे डॉक्टर अमित गुजराती शिरपूर वकील संघातर्फे एड. नरेश शर्मा इंजिनीअर्स असोसिएशन शिरपूर तर्फे संदीप पाटील आणि व्यापारी असोसिएशन तर्फे घनश्याम (गोटू शेठ) अग्रवाल, एड. एस. के. महाजन,  यांनीही यज्ञ सोहळ्यात पूजा आरती करून सहभाग नोंदवला.

या यज्ञ सोहळ्यात 81  ब्राह्मण वृंदांनी पूजा अर्चना व यज्ञविधी पार पाडला.  21 दांपत्य जोडपे या श्री शतचंडी महायज्ञास बसले होते.

 श्री शतचंडी महायज्ञाच्य  भव्य धार्मिक सोहळा  आयोजन   शिरपूर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष एडवोकेट सुहास वैद्य ब्रह्म युवाशक्ती मंचचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी व भगिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वासंती वैद्य यांच्यासह शिरपूर शहरातील संपूर्ण ब्राह्मण समाजाचे अनमोल सहकार्य लाभले.शिरपुर तसेच डॉक्टर्स क्लब, शिरपूर वकील संघ, इंजीनियर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन  शिरपूर यांचेही विशेष सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने