आमदार व माजी मंत्री श्री जयकुमार रावल व इतर पदाधिकारी यांच्यावरील खोटा अॅट्रोसिटी गुन्हा रद्द करा - श्री राजपूत करणी सेना



शिरपूर प्रतिनिधी - शिंदखेडा तालुक्याचे आमदार व माजी मंत्री श्री जयकुमार रावल व इतर पदाधिकारी यांच्यावरील खोटा अॅट्रोसिटी गुन्हा रद्द करा  अशी मागणी श्री राजपूत करणी सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी शिरपूर व तहसीलदार शिरपूर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

हिंदू धर्मचा पवित्रा सन दसरा या दिवशी शिंदखेडा ता. येथील दोंडाईचा शहरात रावण दहन चा कार्यक्रमा दरम्यान माननीय आमदार जयकुमार रावल यांच्या कडून एका "व्हिलन या शब्दाचा अन्वयार्थ राजकीय वैमण्यास्यातून विरोधी लोकांनी भिल्ल" या आदिवासी समाजाचा अपमान झाला अश्या प्रकार ची खोटी बदनामी करण्यासाठी अॅट्रोसिटी गुन्हा केला.
यामुळे अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल झाल्याने समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक वातावरण खराब होत असून यातून काही लोक राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न करत आहेत व आदिवासी लोकांच्या भावना भडकवून राजकीय डाव साधत आहेत त्यामुळे सदर घटनेमुळे राजपूत समाजाच्या देखील भावना दुःखी झाले असून आम्ही राजपूत करणे सेनेच्या वतीने प्रशासनास विनंती करतो की सदरील घटनेच्या सखोल तपास करून सत्यता तपासून दाखल झालेले जातीवाचक गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी करत आहोत. या भावना आपण आपल्या माध्यमाने शासनापर्यंत पोहोचवून आमची मागणी मान्य करण्यासाठी आपणास विनंती करत आहोत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनावर अनिलसिंग गिरासे (शिरपूर ता. अध्यक्ष ) सुरेंद्रसिंग राजपुत (जि. उपाध्यक्ष) योगेश विनायक कोकणी, राज सिसोदिया,भरत सिंह राजपूत, प्रदीप राजपूत मनोज सिसोदिया, स्वप्निल सुभाष जमादार, राजपूत, मुकेश गिरासे, विनोद गिरासे देवेंद्र राजपूत, धीरज राजपूत, संग्राम सिंग राजपूत प्रदीप राजपूत, अंबालाल राजपूत प्रशांत राजपूत रोहिदास राजपूत इत्यादी समाज बांधवांच्या सह्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने