शिरपूर प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात विजयादशमीच्या रावण दहनाच्या कार्यक्रमावरून झालेल्या किरकोळ वादविवाद व चर्चा यांच्या गैर अर्थ काढून राजकीय डाव साधून आदिवासींच्या भावना भडकवल्या गेल्या व या वादातून शिंदखेडा मतदार संघाचे आमदार व माजी मंत्री जयकुमार भाऊ रावल व भाजपाचे इतर पदाधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटी कायदा( अनुसूचित जमाती संरक्षण कायदा) अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करून काही आदिवासी बांधवांची दिशाभूल करून काही समाजकंटकांनी जिल्ह्यातील जातीय सलोखा दूषित करण्याच्या प्रयत्न केला असून या मागून काही अदृश्य राजकीय डाव साधत आहे अशी चर्चा काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये फिरत आहे.
या अनुषंगाने समस्त क्षत्रिय राजपूत समाज शिरपूर तालुका व करणी सेना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा , इ संघटनांच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी सो. शिरपूर भाग यांना निवेदन सादर करण्यात आले असून शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील रावण दहन कार्यक्रमांतर्गत झालेल्या कथित वक्तव्यावरून आमदार जयकुमार रावल व भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेला जातीवाचक गुन्हा हा खोटा गुन्हा असून तो त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून या निवेदनातून करण्यात आले आहे.
सदरच्या निवेदनावर राज देशमुख, देवेंद्र राजपूत, केवलसिंग राजपूत, नितीन राजपूत, महेंद्र राजपूत, अमोल राजपूत ,माधव सिंग राजपूत ,भिकेसिंग राजपूत, भरत राजपूत,(शिवसेना) रवींद्र चौधरी, राज सिसोदिया, मयूर राजपूत, दीपक राजपूत, गजू राजपूत, संग्राम सिंग राजपूत, नगरसेवक राजेंद्र राजपूत ,पप्पू राजपूत, संदीप सिसोदिया, धीरज राजपूत ,रजेसिंग राजपूत, राजू टेलर ( शिवसेना) शुभम राजपूत ,नारायण चौधरी ,मुन्ना राजपूत ,चेतन राजपूत ,सोनू राजपूत, नितीन गिरासे ,दिग्विजय गिरासे, आदित्य कुलकर्णी, राज गिरासे अंबालाल राजपूत , स्वप्निल राजपूत, भरत राजपूत,देवेंद्र राजपूत, योगेंद्र सिसोदिया, जयसिंग राजपूत
यांच्यासह इतर अनेक समाज बांधवांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहे.

