धुळे प्रतिनिधी - धुळे जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेने महामार्गावरून होणारी अफुची तस्करी रोखण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे.
मुंबई आग्रा महामार्गावरील आर्वी येथे तालुका पोलिसांच्या पथकाने मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या अफूची तस्करी करणाऱ्या गुजरात मधील कार सह १८ लाखांच्या अफूच्या माल जप्त करून कारवाई केली आहे मात्र चालक पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
दिनांक 18 रोजी दुपारी आर्वी तालुका धुळे येथे तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यादरम्यान सायंकाळी ५.२५च्या सुमारास एक महिंद्रा मॉडेल चे कार क्रमांक G J 01 RP 1281 हे धुळ्याकडून मालेगाव कडे जाताना दिसले. याबाबत संशयालाने पोलिसांनी या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला लावून गाडीतून पसार झाला त्यामुळे संशयित वाहण्याची तपासणी केली असता त्यात १८ प्लास्टिकच्या गुन्ह्यात अफूच्या बोंडांच्या तुकड्यांच्या चुरा भरलेला आढळून आला एकूण ९ लाख 93 हजार 180 रुपये किमतीच्या 331 किलो अपुच्या बोंडांच्या तुकड्यांच्या चुरा व ८ लाखांची कार असा एकूण 17 लाख 93 हजार 180 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा नोंद झाला आहे.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक बी.जी .शेखर पाटील, पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर काळे पो. काँ. सुनील विंचुरकर, प्रवीण पाटील, किशोर खैरनार, नितीन दिवसे ,अमोल कापसे इत्यादी पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे.
सदर कारवाईचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी कौतुक केले आहे.
