रामी गावात विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार रावल यांच्या हस्ते संपन्न




दोंडाईचा -  दि.24 Oct.2022 रोजी विशाल खान्देश चे नेते माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदार सघांचे भाग्यविधाते *आमदार मा.श्री.जयकुमार भाऊ रावल यांच्या शुभ हस्ते रामी गावात रामी गावाचे भाग्यविधाते  मा.श्री.कुलदिपभाऊ गिरासे सरपंच ग्रा.पं.रामी यांच्या सत्तेत झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भव्य उदघाटन सोहळा संपन्न झाला असून यात वॉटर फिल्टर प्लांट चे भव्य उद्घाटन, जि.प.शाळा येथील पेव्हर ब्लॉक चे उद्घाटन, जि.प.शाळा व अंगणवाडीतील मुलांसाठी आणलेल्या खेळण्याचे लोकार्पन, दलित वस्ती व जनसुविधा योजनेतून साकारलेल्या रस्त्यांचे लोकार्पन, कचरा कुंडीचे लोकार्पन, सी.सी.नालीचे लोकार्पण, दलित वस्तीतील हायमास्ट चे लोकार्पण तसेच गावठाण येथील हायमास्ट चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मा.श्री महाविरदादा रावल* (शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.धुळे) *मा.ताईसो.वंदनाताई ईशी* (सभापती पं.स. शिंदखेडा) *मा.श्री.भाऊसाहेब कामराजजी निकम* (माजी जि.प.उपाध्यक्ष धुळे) *मा.श्री.भाऊसाहेब नारायणजी पाटील* (चेअरमन मार्केट कमिटी दोंडाईचा) *मा.श्री.भाऊसाहेब रणजीतजी गिरासे* (उपसभापती पं.स. शिंदखेडा) 

*मा.श्री.निखिल भाऊ राजपुत* (मा.बांधकाम सभापती न.पा.दोंडाईचा)

*मा.श्री.पहेलवान रावसाहेबजी राजपुत* (चेअरमन मार्केट कमिटी धुळे) *मा.श्री.नरेंद्र भाऊ गिरासे* ( माजी नगरसेवक न.पा.दोंडाईचा) *मा.श्री.डि.एस.गिरासे सर* *मा.श्री.मनोज निकम सर* तसेच गावातील सर्वच समाजातील जेष्ठ तरूण सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने