गाडीलोहार समाज महासंघ चे वतीने गुणगौरव व सन्मान सोहळा संपन्न*



आनंद जीवन स्वामी .. गुणवंताचा ज्यांनी सत्कार केला नाही ते समाजाला विसरले असे जाणवत आहे समाजात कार्य करीत असताना गुणवंत विद्यार्थी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रस्तावना देणे आवश्यक आहे असे मत पूज्य आनंदजीवन स्वामी यांनी व्यक्त केले. 
गाडी लोहार  समाज महासंघाच्या वतीने दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी स्वामीनारायण मंदिर , देवपूर , धुळे येथे लोहार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
 यावेळी व्यासपीठावर पूज्य आनंदजीवन स्वामी , धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप कर्पे, गाडी लोहार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप आप्पा लोहार, महासंघाचे अध्यक्ष अमित गोराणे यासह विविध मान्यवर उपस्थित होते, महापौर प्रदीप कर्पे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  लोहार समाज कष्टाळू व एकजूट असून त्यांचा प्रत्यय  येथे येत आहे. समाजात गुणगौरव कार्यक्रम राबवण्यात येतात ही एक सकारात्मक बाब समोर येत आहे. काम करीत असताना सामाजिक बांधिलकी जपले पाहिजे , चांगले काम केले तेव्हा चांगले होते. असेच काम करत राहा.  कोणतेही काम करीत असताना कमीपणा मानू नका, यश एकदम प्राप्त होत नाही तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. येथे अनेक समाज बांधव असे आहेत की त्यांनी त्यांच्या क्षेत्रात खूप मोठे योगदान देऊन येथपर्यंत पोहोचवले आहेत. तेव्हा परिश्रम, जिद्द व चिकाटी ही चातूर्सुत्री आपल्या अंगी बाळगा,  यश तुमच्या मागे धावेल. कधीही मागे वळून पाहू नका आपण करीत असलेल्या कामात 100% योगदान द्या. थातुर मातुर काम करू नका,  जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत व प्रामाणिकपणे काम करा असा मौलिक सल्ला यावेळी महापौर प्रदीप कर्पे यांनी दिला. लोहार समाजातील 150 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यातून 600 समाज बांधव यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश राठोड , मिलिंद लोहार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ अनिल गोराणे यांनी केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र शितपुरे , प्रकाश राठोड , संदीप गोराणे यांनी  परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने