हर्षवर्धन पाटील यांनी घेतले बाबीर देवाचे दर्शन! प्रतिनिधी दत्ता पारेकर




     पुणे: माजी मंत्री व भाजप नेते  हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील रुई येथील प्रसिद्ध श्री बाबीर देवाची यात्रेनिमित्त पूजा करून  दर्शन घेतले. यावेळी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी बाबीर देवाकडे हर्षवर्धन पाटील यांनी साकडे घातले.
        रुई येथील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या बाबीर देवाची ची यात्रा कालपासून सुरू झाली आहे. बाबीर बुवा हे आपले सर्वांचे श्रद्धास्थान आहे. लहानपणापासून प्रत्येक वर्षी मी इथे यात्रेसाठी येऊन बाबीर देवाचे आशीर्वाद घेत असतो. बाबीर देवाचे दर्शन घेतल्यावर वेगळी प्रेरणा मिळते व त्यापासून निर्माण झालेला उत्साह कायम ऊर्जा देत असतो, असे गौरवोद्गार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
     आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबीर देवाची यात्रा दिवसेंदिवस वाढत चालली आहे, असे हर्षवर्धन पाटील नमूद केले. यावेळी त्यांनी यात्रेसाठी महाराष्ट्रसह  कर्नाटक मध्यप्रदेश तेलंगणा या आलेल्या भाविकांशी संवाद साधला. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्ष रहावे, अशी सूचनाही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी संबंधितांना दिली.  यावेळी त्यांनी अमोल भिसे मित्रपरिवारने आयोजित केलेल्या गजीढोल स्पर्धा मध्ये गजिढोल  वाजविण्याचाही  आंनद लुटला . बाबीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने