मुंबई वृत्तसंस्था - राज्यात झालेली राजकीय उलथापालट त्यानंतर आलेली राजकीय अस्थिरता वाढत असलेली महागाई बेरोजगारी यासोबत सामान्य नागरिक लढा देत असताना आता पुन्हा नागरिकांना वीज बिलांच्या शॉक बसणार असून वीजबिले आणखी महाग होण्याची संकेत दिसत आहेत.
दर वाढीसाठी महावितरण ने राज्य विद्युत नियमक आयोगाचे चर्चा केली असून त्यावर वीज दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे त्यामुळे आता भविष्यात पुन्हा वीज दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळत असून त्याच्या परिणाम विद्युत बिलावर दिसून येणार आहे.
आणि महागाईच्या या आगीत आता वीज बिलाचा देखील शॉक लोकांना बसणार आहे. वीज दरवाढीबाबत आयोगाने महावितरण ला याबाबतच्या प्रस्ताव तयार करण्यात सांगितले असून कोविड काळात लॉक डाऊन आणि संक्रमण यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती महावीत्ण वितरणने सांगितले आहे तसेच या काळात महावितरणची थकबाकी वाढली पण कंपनी वसूल करू शकली नाही कोविड काळात 70 हजार कोटी रुपयांची एकूण थकबाकी होती त्यात अजूनही मोठी थकबाकी वसुलीची शिल्लक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे दरम्यान महावितरण महागडे वीज खरेदीच्या हवाला देत कंपनी नागरिकांकडून अगोदरच इंधन समायोजन शुल्क वसूल करत आहे मात्र थकबाकी वसूल करण्यात अपयश आल्याच्या फटका आता ग्राहकांना बसणार आहे विशेष बाब म्हणजे सरकारी विभाग व संस्था यांच्याकडूनच वीज बिलाची सर्वात जास्त थकबाकी आहे राज्यातील पाणीपुरवठा पथदिव्यांची वीज बिल महावितरण अजूनही बसून केलेले नाहीत त्यातून 24 कोटी रुपयांच्या पुढे ही थकबाकी आहे. मात्र सामान्य नागरिक जो नियमित वीज बिल भरतो त्यावर आता पुन्हा यामुळे 20 दरवाढीचे संकट ओढवले आहे. सामान्य विज ग्राहकाने विज बिल न भरल्यास महिन्याभरातच वीज बिलासाठी वीज मंडळाच्या कर्मचारी तगादा लावून कनेक्शन कट ची धमकी देत असतात व सक्तीची वीज बसली करत असतात. मात्र सरकारी विभवांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यात ही तत्परता वीज वितरण कंपनीकडून दाखवण्यात येत नाही परिणामी या सर्वांच्या घटका आता सामान्य ग्राहकाला बसणार असून वीज दर वाढीचे संकेत मिळत आहेत.
