मयत पोलीस पाटील यांच्या कुटुंबांसोबत साजरी केली पोलीस पाटलांनी,दिवाळी, भडने येथील पोलीस पाटील शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेचा अभिनव उपक्रम




भडने  - पोलीस पाटील म्हटला म्हणजे गृह खाते व महसूल विभाग,शासनाचे नाक कान व डोळा,म्हणून जबाबदारी पाहणारे घटक आहेत गावातील प्रत्येक सुख दुःखाच्या ठिकाणी पोलीस पाटील तसेच धावून येतात तसेच त्यांचे ग्रामीण भागात गावात कायदा व सुव्यवस्था  नेहमी प्रयत्न असतात अशाच घटकांसोबत काम करत असताना, पोलीस पाटलांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे पोलीस पाटील, यांचे जेव्हा, अचानकपणे निधन होते तेव्हा पूर्ण परिवाराप्रमाणे पोलीस पाटलांवर मोठा आघात होतो अशीच एक उदाहरण शिंदखेडा,तालुक्यातील पाटण येथील पोलीस पाटील चंद्रकांत पवार व आकडसे, येथील  पोलीस पाटील सुनील कोळी यांचे मागील सहा महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले, या,घरातील करता पुरुष गेल्यामुळे या दोघ, कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता, या कुटुंबावर खूप मोठी जबाबदारी होती, दोघी पोलीस पाटील घरातील एकुलता एक असल्याने त्यांच्या पश्चात लहान मुलं , मुलगी ,यांना आपल्या वडीलाची जाणीव देखील झाले नाही अशा दुःखाच्या प्रसंगी शिंदखेडा तालुका पोलीस पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील भडणे येथील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी कुमरेज येथील पोलीस पाटील प्रदीप गिरासे यांनी भाऊबीजेच्या दिवशी अक्कड से व पाटण येथील पोलीस पाटील यांच्या कुटुंबांना फराळ मिठाई देऊन त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी करून त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांना दीपावली सणासुदीच्या काळात एक भेट देऊन त्यांच्या समवेत भावबिज दिवाळी साजरा करून,, त्यांच्यावरील दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलीस पाटील संघटना नेहमी माहित पोलीस पाटलांच्या सुखदुःखाच्या वेळेस नक्की ठामपणे उभे राहील असा आशावाद,माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केला त्यांच्या या अभियोग्य उपक्रमाबद्दल संघटनेचे मनोहर भदाणे चरणसिंग गिरासे गणेश गिरासे, छोटू पाटील, भैय्या नगराळे आदींनी कौतुक केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने