पुणे:चाकण एमआयडीसी मधील सावरदरी ( ता.खेड ) येथे छेडछाड व काही संशयातून दोन तरुणांचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सुरज नंदकुमार चव्हाण (वय -२७) व अनिकेत किसन पवार (वय-२४ दोघेही सध्या रा. सावरदरी ) अशी या खून झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी
स्वप्नाली सूरज चव्हाण (वय -२९ सध्या रा. सावरदरी, मूळ रा. जि. सातारा ) यांनी महाळुंगे पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून प्रदिप दिलीप भगत ( सध्या रा. सावरदरी, मूळ रा. वाशीम ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या सावरदरी गावातील भक्ती अपार्टमेंट जवळ यातील प्रमुख संशयित आरोप प्रदिप दिलीप भगत याने फिर्यादी यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेची छेड काढून तिला वारंवार त्रास देत होता. तसेच संबंधित महिलेच्या घराच्या स्नानगृहाच्या खिडकीची काच फोडल्याच्या संशयातून फिर्यादी महिलेचे पती सुरज चव्हाण (वय २७) व त्यांचा मित्र अनिकेत पवार (वय-२४) दोघे आरोपी प्रदीप भगत याला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या जोरदार वाद झाला. आरोपी प्रदिप भगत याने सुरज आणि अनिकेत या दोघांच्या पोटावर धारदार सुऱ्याने सपासप वार करून जखमी केले. या दोघांना स्थानिकांनी तत्काळ चाकण आणि तळेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. महाळुंगे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
%20(20).jpeg)