प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: MIT संस्थेने एका वीरपुत्राला पाच वर्षांसाठी 50 टक्के शुल्क माफ केले आहे. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
दीपाली मोरे यांचे पती विजय मोरे यांना 2004 साली काश्मीर मध्ये दहशतवाद्यांसोबत चकमकीत वीरमरण आले. त्यावेळीस दीपाली मोरे या गर्भवती होत्या. त्यामुळे मुलाच्या जन्मापूर्वीच पतीला वीरमरण आल्याने, दीपाली मोरे यांच्यावर मोठे संकट कोसळले. त्यातच जन्मतःच मुलाचे हृदय कमकुवत असल्याने मोरे यांना विश्वजीतची काळजी घ्यावी लागत होती.
Tags
news