शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील आमोदे गावातील शेतकऱ्याने राहत्या घरी गळ फास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक एक जुलै रोजी दुपारी समोर आली आहे.
सदर मयत शेतकऱ्याचे नाव मानसिंग गुलाबसिंह राजपूत वय 56 असून त्यांनी दुपारी चार ते पाच वयाच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मानसिंग राजपूत हे काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते त्यांच्या पत्नी ललिताबाई राजपूत यांचे कोरोना ने निधन झाले होते, मानसिंग राजपूत यांच्याकडे 60 गुंठे शेती होती त्यांच्या उदरनिर्वाह शेती व्यवसायावर होत होता मात्र निसर्ग साथ देत नसल्याने व शेतीत त्यांना उत्पन्न मिळत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत होते व त्यांच्यावर कर्जाच्या डोंगर उभा राहिला होता कर्जाच्या विवंचनेत खचून जाऊन त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
मानसिंग राजपूत यांना त्यांच्या पक्षात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
