हागल्या पादल्याला जनहित दाखल करणारे भ्रष्टाचाराच्या लढाईतील कथित समाजसेवक कुठल्या बिळात जावुन बसले आहेत ?
बेहिशोबी संपत्तीच्या नावाने गळा काढणारे ज्येष्ठ सामजिक नेते अथवा लोकशाही मूल्यांची चाड असलेली वकील मंडळी लोकशाहीचे अवमूल्य उघड्या डोळ्याने पाहूच कसे शकतात ?
राज्यसभा तसेच नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमधील बेहिशोबी संपत्तीचा उन्मात्त उघड्या डोळ्याने देशातील 130 कोटी जनतेने पहिला. राजकीय पक्ष आणि नेत्यांकडे हजारो कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता आहे. पैशांच्या जोरावर देशातील राजकीय पक्षाचे नेते ऐका ऐका मतामधून निवडून गेलेल्या लोक प्रतनिधिंना बाजारात उभ्या केलेल्या जनावरांना जसे विकत घेतात तसेच द्विवार्षिक राज्यसभा व विधान परिषदेच्या बाजारात ठोक भावाने विकत घेत आहेत. अशी चर्चा रस्त्यावरच्या लोटगाडीवाल्या पासून सफाई कामगारपर्यंत! तसेच शाळेत जाणाऱ्या 8 ते 10 वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून स्मशानात गवऱ्या पोहोचलेल्या जख्ख वृद्धा पर्यंत करीत आहेत. अशिक्षित शेतमजुरांना पासून ते धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणींच्या मालक-मालकीनिंपर्यंत राजकीय नेत्याच्या 12 पिढीचा चिडून चिडून उद्दार करीत आहेत. नुसती चर्चा करीत नाहीत. तर, राजकीय नेत्यांच्या खानदानी वारसांच्या अब्रूच्या चिंध्या चिंध्या करीत आहेत. अर्थात बसल्या जागेवर आपल्या संतप्त भावनांना वाट करून देणे यासाठी या व्यतिरिक्त त्या बिचार्याच्या हातात अन्य पर्याय नाही. अशा या नाहीरे वर्गा बद्दल माझी अथवा कोणाची तक्रार असल्याचे काहीही कारण नाही. नाहीरे वर्गाला त्यांचे जीवन कसे जगावे याची समस्या दिवस रात्र छळत असते. त्यांच्या कुटुंबाला ज्याची नितांत आवश्यकता आहे त्या अवश्कतेच्या पूर्तीतेसाठी अख्खकुटुंब दिवस रात्र राबत असतं. पण त्यांना दोन वेळेचे पोटभर अन्न सुद्धा मिळू शकत नाही.
अर्थात अश्या नाहीरे वर्गाबद्दल मत व्यक्त करण्याची ही वेळ नाही. पण पाण्यासारखा पैसा बाळगणाऱ्या राजकारणाला व्यवसाय मानणाऱ्या ढोंगी राजकारण्यांची सत्यस्थिती जनते समोर कोणीतरी मांडण्याचे धाडस केलेच पाहिजे. रस्त्यावर गुडगुडी वाजवून मदाऱ्याच्या खेळाचे स्वरूप देणाऱ्या राजकीय मदाऱ्यां विरुद्ध सामान्य जनतेच्या मनातील हा संताप आहे. "रस्तेवरचा मदारी बच्चे लोग टाली बजाव ! अभी निकालने वाला है, बारा फीट का लंबा है" असे सांगून गर्दी गोळा करतो. भुता प्रेता पासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्याचे टेंडर भरतो. तुम्हाला नोकरी मिळेल. तुमचे वाईट दिवस निघून जातील. 'अच्छे दिन आयेगे' वैगेर वैगरे थापा मारून लाकडाचा भुस्सा भरलेले ताविज विकून बेमालूम पणे मूर्ख बनवून गायब होतो. आपल्या शब्दांच्या आतिशबाजीवर गल्ला गोळा करून आपल्याला लुंगवून जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी गल्ला गोळा करायला दुसऱ्या चौकात दाखल होतो. भारतीय राजकारणाचे आजचे स्वरूप मदाऱ्याच्या खेळा पेक्षा काही वेगळे आहे का?
वर म्हटल्या प्रमाणे राजकारणातील काही नेत्यांकडे मोजता मोजता संपणार नाही एवढी प्रचंड बेहिशोबी मालमत्ता आणि संपत्ती आहे. तरीसुद्धा त्यांची संपत्तीची हाव काही सुटत नाही. गुवाहटी येथून निसटून आलेल्या राजपूत नावाच्या एका आमदाराचे संभाषण ऐकून धक्काच बसला. अपहरण करून डांबवून ठेवलेल्या प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये दिल्याची ध्वनीफित ऐकून मी अक्षरशः उडालोच ! कदाचित त्या संभाषणात अतिशयोक्ती असेलही. पण दहा पाच कोटीचे का होईना व्यवहार तर झालेच शिवाय भगोड्या आमदारांच्या दिमतीला शेकडो आलिशान गाड्या आहेत. अर्धा डझन खाजगी विमानांची सोय आहेच. ज्या पंचतारांकित हॉटेलचे चोवीस तासाचे केवळ भाडे ( यात चहा पाणी जेवण खाणे पिणे नाही ) किमान 15 ते 25 हजार आहे. अशा अलीशान हॉटेल मधील शेकडो खोल्या गेली 20 दिवस वापरत असलेल्या त्या खोल्याच्या भाड्याची रक्कम किती कोटी झाली असेल याचा अंदाज तर शक्य नाही ! या व्यतिरिक्त उच्च दर्जाची विदेशी मदिरेचा ( परदेशी दारू ) महापुर मिनाक्षी बद्दल मी बोलत नाही. मदिरा आली की मिनाक्षी आलीच. रम रमा आणि रमी यांची एकत्रित व्यवस्था असल्याशिवाय पट्टीचे कसलेले राजकीय पहिलवान मटनाचे थाळी आणि पिठलं भाकरी यावर थोडेच थांबणार आहेत ? राज्यसभा आणि विधान परिषदेच्या मतदारांच्या वास्तव्यासाठी एका पक्षाच्या पंचतारांकित हॉटेलचा झालेल्या मतदानाच्या एका एपिसोडचा खर्च 13 कोटी रुपये असल्याचे माझ्या एका जुन्या सहकार्याने सांगितले. लोकशाहीचे एवढे बीभत्स रूप आणि वस्त्रहरण जगाच्या पाठीवर इतरत्र कुठे बरे झाले असावे ?
मी काही कुठल्याही एका राजकीय पक्षाला दोष देत नाही. हमाममे सब नंगे हे' याला झाका आणि त्याला काढा असे शक्यच नाही. असे काही प्रकार यापूर्वीही घडले होते . पण कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचे हे अत्यंत निर्लज्ज व खुलेआम बेशर्म पणा स्वीकारून घडले आहे. पंचतारांकित संस्कृतीच्या छताखाली पत्रकारांना मुलाखती देणे हा मात्र सार्वजनिक निर्लज्ज पणाचा कळस होय ! हाही प्रकार प्रथमच घडला असा माझा दावा नाही. पण यापूर्वी घडलेल्या अशा घटनांची चीड निर्माण झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता मात्र घृणा निर्माण झाली आहे. "ना खाऊंगा ना खाने दुंगा" या शब्दांवर नितांत श्रद्धा ठेवून अनवधानाने काहोहिना घडलेल्या चुकांचा पच्छाताप सावधान म्हणताच भर लग्न मंडपातून पळून जाणाऱ्या समर्थ रामदासांची सुधारून वाढवलेली आवृत्ती म्हणजे देशाचे विद्यमान नेते माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी होत ! 3 वर्षाच्या संसाराचा त्याग करून मोदी साहेब बाहेर पडले ते थेट पंतप्रधानच झाले. माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांनी त्यांच्या शब्दावर साधेपणाच्या, प्रामाणिकपणाच्या,मातृप्रेमाच्या दर्शनीक जाहिरातीना भुलून किंवा बळी पडून विश्वासापोटी म्हना किव्हा श्रद्धेच्या किव्हा अंधश्रद्धेच्या पोटी त्याच्याबद्दल एक स्वप्न पाहिले होते. ग्रामीण भागात एक म्हण आहे. 'आधीचाच कलेक्टर चांगला होता. अशीच अवस्था देशाच्या सर्वोच्च पदी असलेल्या नेत्याची झाली आहे. मदाऱ्याची गोष्ट वर सांगितली त्या प्रमाणे "अभी निकलने वाला है 12 फुटका लंबा है" असा कधीच निघाला नाही. देशाच्या व तुमच्या आमच्या दुर्दैवाने आज "ना खाऊंगा ना खाने दुंगा" अशा म्हणणाऱ्या नेत्याने केली आहे. असो !!
सर्व विश्लेषण यासाठी केले की, प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य, भ्रष्टाचार मुक्त समाजाची निर्मिती भ्रष्टाचाराला लगाम घालण्याकरीता लोकायुक्त कायद्याचा आग्रह धरणारे व यासाठी प्राण पणाला लावणारे ऋषी तुल्यनेते मा.आण्णा हजारे साहेबांना काळा पैशाचा हा नंगा नाच दिसत नाही का ? भ्रष्ट्राचाराच्या विरुध्दची चीड, राग, संताप रक्त खवडून उठणे इत्यादी मा. आण्णा हजारेंच्या भावना बोथठ तर झाल्या नाहीत ना ? या पार्श्वभूमीवर देशातील १३० कोटी जनता बाल भ्रम्हचारी माननीय आण्णा साहेब हजारे यांच्या भूमिकेकडे फार आशेने पाहत आहे. हे घडत असतांना मा. आण्णा हजारे साहेबांनी एक शब्द सुद्धा काढू नये याचेच आश्चर्य वाटते. गेल्या महिन्यातच आण्णा साहेबांनी आमरण उपोषणाची गर्जना केली होती. आज मीतीस लोकशाहीचे सुरू असलेले वस्त्रहरण , नंगा नाच २४ तासात थांबला नाही तर मी आमरण उपोषनाला बसेन मा. आण्णा हजारे साहेबांनी नुसती धमकी दिली तरी सुद्धा देशात राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार हा शब्द ऐकताच शरीरातील रक्ताच्या उकाळ्या फुटू लागतात ! भ्रष्टाचारा विरुध्द लढण्याचे परमेश्वराने त्यांना अमार्यद मनोबल व असामान्य शक्ती दिली आहे. अश्या सौभाग्यवती अंजलीताई दमानीया व दुरदर्शन संचाचे बटन दाबताच तावा तावाने घसा कोरडा करून संताप व्यक्त करणारे किरीट सोमय्या, किंवा आपच्या श्रीमती लक्ष्मी मेनन असे अगणित नेते आणि नररत्न महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेले नेमके आहेत तरी कुठे ? राजकीय अर्धम्यांचा खुला नंगा नाच सुरू असतांना हे सर्व धर्मवीर मूग गिळून बसूच कसे शकतात ? याचे आश्चर्य वाटते. हागल्या पादल्याला मुंबई उच्च न्यायालय अथवा सर्वच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावनारे कथित समाज सुधारक नेमके गेले तरी कुठल्या बिळात ? देश भरात कुठलीही घटना घडली की, दूरचित्रवान्यांवर उलट सुलट मत व्यक्त करणारे कायदे पंडित काही कमी नाहीत. डझन, अर्धा डझन तर घटना तज्ञ आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या या किड्यांपासून विकास पुरुष आदरणीय नितीन गडकरी साहेब सुद्धा सुटु शकले नाहीत. समाजाचे दिपस्तंभ लुकलुक करताना कुठे दिसत नाहीत. भ्रष्टाचार निर्मूलनाचे व भ्रष्टाचार मुक्त समाजाच्या निर्मितीचे व्रत स्विकारलेल्या एकाही व्रतस्थाने इडी, सी. बी.आय , आयकर विभाग, निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे गृह खाते याकडे साधी २ ओळीची तक्रार सुद्धा करू नये. याचेच आश्चर्य वाटते ! मा.उच्च न्यायालय, मा. सर्वच्च न्यायालयाने यांच्यासाठी न्यालायचे दरवाजे तर बंद केले नाहीत ना ? खरे तर निर्वाचन आयोगाने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या तपासी यंत्रणांनी अथवा उच्च किंवा सर्वच्च न्यायालयाने खरे तर सुमोटो दखल घेतली पाहिजे. जनहित याचिका दाखल करण्याकरिता निष्कलंक चारित्र्याच्या एखाद्या कायदे तज्ञांने किंवा समाज धुरीनाने हे शिवधनुष्य पेलावे अशी माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
कौन कहता है आसमान मै सुराग हो नही सकता ?
एक पत्थर तो तबीयत उछालो यारो !
ऐसी लढाई के लिए किसी कारवा की जरूरत नही होती.
हम अकेले ही निकले थे जाने ऐ मंजील मगर ,
लोग आते गऐ और कारवा बनता गया.
अनिल गोटे
Tags
Politics
